IPL 2025, MI vs DC : मुंबई इंडियन्सचा हंगामातील दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

दिल्ली कॅपिटल्सचा ५ सामन्यांनंतर हा पहिला पराभव ठरला आहे.

65
IPL 2025, MI vs DC : मुंबई इंडियन्सचा हंगामातील दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव
IPL 2025, MI vs DC : मुंबई इंडियन्सचा हंगामातील दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs DC) असा झालेला साखळी सामना इम्पॅक्ट सब खेळाडूंनी गाजवला. मुंबईला क्षेत्ररक्षकांनी जिंकून दिला. एरवी या सामन्यांत धावांची लयलूट झाली. आणि एकूण ३९८ धावा निघाल्या. मुंबई इंडियन्सच्या ५ बाद २०५ या धावसंख्येला उत्तर देताना दिल्लीने १८ षटकांपर्यंत ७ बाद १८३ अशी मजल मारली होती. आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) हा एकमेव फलंदाज मैदानात होता. विजयासाठी १२ चेंडूंत २३ धावा हव्या असताना त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूंवर चौकार वसूल केले. त्यामुळे आव्हान १५ धावांवर आलं होतं. अशावेळी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी पुढील चेंडूवर आशुतोषने दुहेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. तो फसला. आणि आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) १७ धावा करून बाद झाला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) मैदानात आला. आधीच्याच सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. पण, यावेळी तोही दुहेरी धाव चोरण्यात अपयशी ठरला. आणि अगदी एखाद्या इंचाने तो धावचित झाला. आता दिल्लीची अवस्था ९ बाद १९३ अशी झाली. मोहीत शर्मा (Mohit Sharma) फलंदाजीला आला. त्याने १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण, सँटनरच्या अचूक फेकीने तो ही धावचित झाला. तीन चेंडूंवर तीन फलंदाज धावचित होत हा सामना नाट्यमयरित्या मुंबई इंडियन्सनी जिंकला. (IPL 2025, MI vs DC)

(हेही वाचा – Water Tankers : राजकीय पक्षांना टँकर लॉबीचा पुळका!)

दिल्लीचा संघ ३ बाद १५५ वरून १९३ धावांत सर्वबाद झाला. मुंबईने सलग चार पराभवांची मालिका अखेर खंडित केली. आणि यात इम्पॅक्ट सब म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ऐवजी मैदानात आलेला कर्ण शर्मा महत्त्वाचा ठरला. एकीकडे कसलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ४ षटकांत ४४ धावा देत असताना कर्ण शर्माने (Karn Sharma) ३४ धावा देत ३ बळी मिळवले. त्याच्या लेगब्रेकसाठीच त्याला ऐनवेळी संघात आणलं. आणि तो प्रभावीही ठरला. तर मिचेल सँटनरनेही (Mitchell Santner) २ मोलाचे बळी घेतले. या दोघांनी सामना मुंबईसाठी खेचून आणला. (IPL 2025, MI vs DC)

(हेही वाचा – MNS : मराठी-अमराठी वाद कोणाच्या पथ्यावर?)

दोन फलंदाज धावचित करण्यामागेही सँटनरचा वाटा होता. १९ षटकातील हे नाट्य घडण्यापूर्वी मात्र दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०६ धावांकडे व्यवस्थित वाटचाल करत होता. करुण नायरने (Karun Nair) ४० धावांत ८९ धावा करताना ५ षटकार खेचले. रणजी स्पर्धेतील आपला फॉर्म इथंही दाखवून दिला. हंगामातील पहिला सामना खेळताना करुणने या सामन्यावर छाप सोडली. तो मैदानात असेपर्यंत दिल्लीच विजयाचा प्रमुख दावेदार होता. त्याला अभिषेक पोरेलनेही ३३ धावा करत चांगली साथ दिली. या सामन्यात दिल्लीची मधली फळी मात्र अपेक्षित धावा करू शकली नाही आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. (IPL 2025, MI vs DC)

दुसरीकडे मुंबई इंडियन्सची फलंदाजी छोट्या मैदानावर बहरली. रायन रिकलटन (४१), सूर्यकुमार यादव (४०), तिलक वर्मा (५९) आणि सहाव्या क्रमांकावर आलेल्या नमन धीरने ३८ धावा करत मुंबईला दोनशे पार नेलं. सुरुवातीपासून त्यांनी धावगती षटकामागे १० च्या आसपास ठेवली होती. दिल्लीकडून विपराज निगम आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पहिलं स्थान गुजरात टायटन्सनी पटकावलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.