IPL 2025, MI vs GT : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव, गुजरातने ३६ धावांनी हरवलं

मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

38
IPL 2025, MI vs GT : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव, गुजरातने ३६ धावांनी हरवलं
IPL 2025, MI vs GT : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव, गुजरातने ३६ धावांनी हरवलं
  • ऋजुता लुकतुके

या आयपीएलमध्ये इतर कुठल्याही फ्रँचाईजीकडे नसेल इतकी फलंदाजीतील खोली मुंबई इंडियन्सच्या संघात आहे. आताही गुजरात टायटन्स विरुद्ध तळाला फटकेबाजी करू शकणार दीपक चहर चक्क दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. असं असताना पहिल्या दोन सामन्यांत तरी मुंबईच्या या फलंदाजांच्या फळीनेच निराशा केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेकीचा कौल मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) बाजूने लागला. त्याने विचारपूर्वक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुसरी फलंदाजी घेतली. (IPL 2025, MI vs GT)

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इथं पहिली फलंदाजी घेण्याचा विचारही कुणी करत नाही. रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवाचा फायदा घेऊन इथं दुसरी फलंदाजी करणारा संघ विजयी होतो असं गणित आहे. पण, हे गणित मुंबई इंडियन्सला जमवून आणता आलं नाही. एकतर त्यांनी गुजरात टायटन्सला १९६ धावांची मजल मारू दिली. (IPL 2025, MI vs GT)

(हेही वाचा – Shubman Gill ठरला पहिला भारतीय खेळाडू ; आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा)

शुभमन गिल (Shubman Gill) (३८) आणि साई सुदर्शन (६३) यांनी अर्धशतकी सलामी संघाला करून दिली. ती ही षटकामागे १० धावांच्या धावगतीने. त्यामुळे गुजरातचं काम सोपं झालं. जोस बटलरनेही तिसऱ्या क्रमांकावर ३९ धावा केल्या. त्यामुळे तळाच्या फलंदाजांना फारशा धावा करता आल्या नाहीत तरीही गुजरातने ८ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. (IPL 2025, MI vs GT)

आणि याला उत्तर देताना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रायन रिकलटन ही सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. दोन्ही बळी महम्मद सिराजने घेतले. आणि दोघांना त्रिफळाचित केलं. त्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद ३५ झाली. पुढे कासिगो रबाडा, ईशांत शर्मा, राशिद खान, साई किशोर आणि प्रसिध कृष्णा अशा सर्वांनीच नेटाने गोलंदाजी केली. त्यांनी मुंबईच्या फलंदाजांना वेगाने धावा वाढवू दिल्या नाहीत. (IPL 2025, MI vs GT)

(हेही वाचा – Gudi Padwa 2025 : पराक्रमाची गुढी उभारूया !)

आणि त्या दडपणाखालीच मुंबईची मधली फळी बाद होत गेली. प्रसिध कृष्णाने आपल्या ४ षटकांत १८ धावा देत २ बळी मिळवले. सुर्यकुमार यादवने सर्वाधिक २८ चेंडूंत ४८ धावा केल्या. आणि यात ४ षटकारही ठोकले. पण, त्यालाही साई किशोर आणि प्रसिध यांनी जखडून ठेवलं होतं. तिलक वर्माने ३६ चेंडूंत ३९ धावा केल्या. दोघांखेरित हार्दिक पांड्या (११) आणि नमन धीर यांनीच फक्त दुहेरी धावसंख्या गाठली. तळाला सँटनरनेही नाबाद १८ धावा केल्या. अखेर निर्धारित २० षटकांत मुंबईचा संघ ६ बाद १६० धावा करू शकला. (IPL 2025, MI vs GT)

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना येत्या ३१ मार्चला मुंबईत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्घ होणार आहे. घरच्या मैदानावर मुंबईचं नशीब पालटेल अशी अपेक्षा आता संघ प्रशासन करत असणार.(IPL 2025, MI vs GT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.