-
ऋजुता लुकतुके
सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सना एक खुशखबर मिळाली आहे. संघातील महत्त्वाचा फलंदाज सुनील नरेन हा सामना खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत ही गोष्ट स्पष्ट केली. आधीच्या सामन्यात तब्येत ठिक नसल्यामुळे नरेन खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कोलकाता संघाला मोईन अलीला खेळवावं लागलं. पण, अलीने गोलंदाजीत नरेनची उणीव नक्की भरून काढली आणि कोलकात्याच्या विजयातही मोठा वाटा उचलला. (IPL 2025, MI vs KKR)
‘नरेनची जागा भरून काढणं कठीण होतं. पण, सामन्याच्या दिवशी सकाळी मला तयार राहण्यास सांगण्यात आलं होतं. आणि माझा भर हा नियमित सरावालाच असतो. त्यामुळे मी सामन्यासाठी सदैव तयार असतो. अर्थात, नरेनची जागा भरून काढणं हे आव्हान आहे. पण, गोलंदाजी मी ते भरून काढू शकलो, याचं समाधान वाटतं,’ असं मोईन खानने बोलून दाखवलं होतं. (IPL 2025, MI vs KKR)
(हेही वाचा – “…अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्क वाढीला सामोरे जा” ; Donald Trump यांची इराणला थेट धमकी !)
कोलकात्या पहिल्या ईडन गार्डन्सवरील सामन्यात सुनील नरेन खेळला होता. यात त्याने २६ चेंडूंत ४७ धावा करण्याबरोबरच २७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पण, हा सामना कोलकाता संघाला गमवावा लागला. त्यानंतरचा सामना नरेन खेळू शकला नाही. पण, आता तो मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडिअमवरील सामन्यात खेळणार आहे. ‘सुनील नरेन संघाबरोबर गेले दोन दिवस व्यवस्थित सराव करत आहे,’ असं कोलकाता संघ प्रशासनाने म्हटलं आहे. (IPL 2025, MI vs KKR)
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघासाठी या हंगामातील हा पहिला घरच्या मैदानावरील सामना आहे. आधीचे चेन्नई आणि गुजरात विरुद्धचे सामने त्यांनी गमावले आहेत. त्यामुळे निदान घरच्या मैदानावर तरी पराभवाची ही मालिका खंडित होईल, अशी आशा मुंबईला आहे. त्यासाठी रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या ही फलंदाजांची फळी चांगली कामगिरी करेल अशी आशा संघाला आहे. मुंबईचा संघ शनिवारी खेळलेल्या सामन्यानंतर एका दिवसात कोलकाताशी खेळायला सिद्ध झाला आहे. (IPL 2025, MI vs KKR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community