IPL 2025, MI vs KKR : ‘नाव रोहित शर्मा नसतं, तर कदाचित आता तो संघात नसता,’ – मायकेल वॉन

IPL 2025, MI vs KKR : या हंगामात रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे.

116
IPL 2025, MI vs KKR : ‘नाव रोहित शर्मा नसतं, तर कदाचित आता तो संघात नसता,’ - मायकेल वॉन
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सनी कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव करत या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. पण, त्याचवेळी माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने रोहीतच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित केली आहे. ‘तो रोहित शर्मा नसता, तर कदाचित एव्हाना मुंबई इंडियन्स संघातून बाहेर असता,’ असं मत समालोचन कक्षातून बोलताना त्याने व्यक्त केलं आहे. (IPL 2025, MI vs KKR)

रोहितने या हंगामातील ३ सामन्यांत अनुक्रमे ०, ८ आणि १३ अशा एकूण २१ धावा केल्या आहेत. मागच्या चार आयपीएल स्पर्धा पाहिल्या तर फक्त एकदा रोहितने ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोलकाता विरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळला. कोलकाताच्या डावातील १६ वं षटक सुरू असताना तो मैदानात उतरला. पुढच्याच षटकांत कोलकाताचा संघ ११६ धावांत सर्वबाद झाला आणि मुंबईसमोर जिंकण्यासाठी ११७ धावांच आव्हान आलं. त्यानंतर रोहित रायन रिकलटनच्या साथीने सलामीला आला खरा. पण, सुरुवातीपासून तो अडखळत खेळत होता. अखेर आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून १३ धावांवर तो बाद झाला. (IPL 2025, MI vs KKR)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय)

रोहितबद्दल क्रिकबझ वेबसाईटशी बोलताना मायकेल वॉनने परखड मत व्यक्त केलं. ‘रोहितची कामगिरी सध्या सरासरी चांगली आहे. बाकी आकडे बरंच काही सांगत आहेत. रोहितचा गतलौकिक पाहता त्याला इतकी संधी मिळत आहे. दुसरा कुणी असता तर त्याला अशी संधी मिळाली नसती. रोहितचा विचार फक्त फलंदाज म्हणून केला जाईल. आता तो संघाचा कर्णधार नाहीए. त्यामुळे फलंदाज म्हणून संघासाठी त्याची उपयुक्तता आता बघितली जाईल. तिथे त्याची कामगिरी अगदीच साधारण आहे,’ असं वॉनने बोलून दाखवलं. (IPL 2025, MI vs KKR)

मैदानावर प्रेक्षकांमध्ये मात्र रोहित लाडका आहे आणि प्रेक्षकांचा पाठिंबा त्याला मिळतो. त्यामुळे संघातून त्याला एकदम काढून टाकू नये असंही मत मायकेल वॉनने व्यक्त केलं. ‘रोहितला संघातून काढून टाकावं किंवा फलंदाजीला खालच्या क्रमांकावर पाठवावं असं मला सुचवायचं नाही. कारण, रोहितचा संघाला उपयोग होणार आहे. त्याला कुणीतरी हे सांगायला हवं की, नेहमीसारख्या धावा कर. सुरुवातीपासून आक्रमक खेळ. त्याच्याकडून धावा होणं जास्त महत्त्वाचं आहे,’ असं शेवटी वॉन म्हणाला. (IPL 2025, MI vs KKR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.