IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय

कोलकाता विरुद्ध मुंबईत झालेले सलग १० सामने मुंबईने जिंकले आहेत.

52
IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय
IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स संघाने सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (MI vs KKR) ८ गडी राखून जोरदार पराभव केला. आणि या हंगामातील पहिला विजय नोंदवला. त्याचबरोबर घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) अनोखा विक्रमही नावावर केला आहे. एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एकाच मैदानावर सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. वानखेडे मैदानावरील (Wankhede Stadium) कोलकाता विरुद्धचा मुंबईचा (MI vs KKR) हा १० वा विजय होता. विशेष म्हणजे, मुंबईने कोलकाताचाच विक्रम मागे टाकला आहे. यापूर्वी कोलकाता फ्रँचाईजीने पंजाब विरुद्ध ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) ९ विजय मिळवले होते.

पाचवेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) यापूर्वी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही (RCB) अनोखा विक्रम साजरा केला आहे. त्यांनी बंगळुरू संघाला मुंबई आणि बंगळुरू अशा दोन्ही ठिकाणी प्रत्येकी आठवेळा पराभव केला आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : ‘घरच्या मैदानाचा फायदा मिळावा असं कुणाला वाटणार नाही,’ प्रशिक्षक चंदू पंडित यांचे विधान)

एकाच संघाविरुद्ध विशिष्ट मैदानावर आयपीएलमध्ये मिळवलेले सर्वाधिक विजय पाहूया,
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (वानखेडे मैदान) – १०
  • कोलकाता नाईट रायडर्स वि, पंजाब किंग्ज (ईडन गार्डन्स) – ९
  • मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (वानखेडे मैदान) – ८
  • मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (चिन्नास्वामी) – ८
  • चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंर्जर्स बंगळुरू (चेपक) – ८
  • कोलकाता नाईट रायडर्स वि. डेक्कन चार्जर्स (ईडन गार्डन्स) – ८
  • सनरायझर्स हैद्राबाद वि. पंजाब किंग्ज (हैद्राबाद) – ८

फक्त इतकंच नाही तर मुंबईने कोलकाता विरुद्ध मिळवलेला हा एकूण २४ वा विजय होता. एका संघाने विशिष्ट संघाविरुद्ध मिळवलेले हे सर्वाधिक विजय आहेत. यानंतर चेन्नई आणि कोलकाता संघांनी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवले आहेत.

(हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकच; संघाचे ज्येष्ठ नेते Bhaiyyaji Joshi यांचे विधान)

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध मिळवलेले सर्वाधिक विजय,
  • २४ – मुंबई वि. कोलकाता
  • २१ – चेन्नई वि. बंगळुरू
  • २१ – कोलकाता वि. पंजाब
  • २० – मुंबई वि. चेन्नई
  • २० – कोलकाता वि. बंगळुरू

सोमवारी मुंबई इंडियन्सनी कोलकाता विरुद्ध ८ गडी आणि ४३ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयात २३ वर्षीय युवा गोलंदाज अश्विनी कुमार (Ashwani Kumar) चमकला. त्याने पदार्पणात धारदार गोलंदाजी करताना ३ षटकांत २४ धावा देत ४ बळी मिळवले. या जोरावर मुंबईने आधी कोलकाताला १६ षटकांत ११६ धावांत गुंडाळलं. आणि मग ही धावसंख्या आरामात पार केली. रायन रिकलटनने (Ryan Rickelton) ४१ चेंडूंत नाबाद ६१ आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ९ चेंडूंत नाबाद २७ धावा केल्या. (IPL 2025, MI vs KKR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.