-
ऋजुता लुकतुके
आधीच मुंबई इंडियन्सनी या हंगामातील आपले पहिले दोनही सामने गमावले आहेत. या दोन्ही सामन्यातील माजी कर्णधार रोहित शर्माचं अपयशही खुपणारं आहे. चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यांत रोहित भोपळाही न फोडता बाद झाला. तर आता दुसऱ्या सामन्यात गुजरातविरुद्ध एक चौकार ठोकून लगेचच तो तंबूत परतला. इतकंच नाही तर आयपीएलच्या शेवटच्या ९ डावांमध्ये रोहितच्या नावावर सहा एकेरी आकडी धावसंख्या जमा झाल्या आहेत. रोहितच्या या खालावलेल्या कामगिरीमुळे माजी राष्ट्रीय खेळाडू संजय मांजरेकरने रोहितच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘रोहितच्या हातातून वेळ निसटत चालली आहे,’ असं मांजरेकरला वाटतं. (IPL 2025, MI vs KKR)
रोहित कारकीर्दीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. इथे त्याला आपला लौकिक टिकवून ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. तो नक्कीच वाईट फॉर्ममधून जातोय. तो त्याच्या नैसर्गिक कुवत आणि कौशल्यावर अवलंबून राहून खेळतोय. पण, आता जुना लौकिक मिळवायचा असेल तर त्याला थोडे जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत,’ असं मांजरेकरने जिओस्टार वाहिनीशी बोलताना सांगितलं. मुंबई इंडियन्स संघाला गुजरात टायटन्सकडून शनिवारी ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रोहित आणि रिकलटन मुंबई इंडियन्सना चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. (IPL 2025, MI vs KKR)
(हेही वाचा – Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू !)
Tough luck tonight.
But now we move on to our first home game on Monday. 🏠#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #GTvMI pic.twitter.com/ZLIGALz61o
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2025
‘रायन रिकलटन आघाडीच्या फळीत खेळतोय. त्याला भारतीय खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना वेळ लागणार. तो दक्षिण आफ्रिकेचा आहे. तेज खेळपट्टीची त्याला सवय आहे. त्यात रोहीतचा फॉर्म खराब असल्यामुळे चांगली सुरुवात मिळायला मुंबई इंडियन्सना अडचणी येत आहेत आणि मधल्या फळीवर दबाव वाढतोय. शिवाय सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि इतर फलंदाजांनाही अशा खेळपट्टीवर धावा जमवायला आवडतात जिथे चेंडू चांगला बॅटवर येतो. धिम्या खेळपट्टीवर अशा फलंदाजांना धावा करणं कठीण जातं. सुरुवातीच्या सामन्यांत त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं, तर पुढे कामगिरीत सुधारणा होत जाईल,’ असं मांजरेकर यांनी बोलून दाखवलं. (IPL 2025, MI vs KKR)
आता घरच्या मैदानावर पुढच्या काही सामन्यांत मुंबईची कामगिरी सुधारले असा विश्वास संजय मांजरेकरला वाटतो. ‘मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू आणि चाहत्यांनाही सुरुवातीच्या दोन पराभवांची सवय झाली आहे. इथून ते चांगला खेळ करतील. चांगली भागिदारी आणि फलंदाजांनी झटपट बाद होणं या दोन गोष्टी पाळल्या तर मुंबईला जिंकता येईल,’ असं मांजरेकर शेवटी म्हणाले. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. (IPL 2025, MI vs KKR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community