IPL 2025, MI vs LSG : दिग्वेश सिंगचं बळी मिळवल्यानंतरचं सेलिब्रेशन पुन्हा चर्चेत

दिग्वेशची गोलंदाजी मुंबईविरुद्ध निर्णायक ठरली.

85
IPL 2025, MI vs LSG : दिग्वेश सिंगचं बळी मिळवल्यानंतरचं सेलिब्रेशन पुन्हा चर्चेत
IPL 2025, MI vs LSG : दिग्वेश सिंगचं बळी मिळवल्यानंतरचं सेलिब्रेशन पुन्हा चर्चेत
  • ऋजुता लुकतुके

मुंबई विरुद्ध लखनौ (MI vs LSG) सामन्यांत दिग्वेश राठीची (Digvesh Rathi) गोलंदाजी दोन्ही संघातील फरक ठरली. मुंबई २०३ धावांचा पाठलाग करत असताना दिग्वेशने पहिल्या ३ षटकांत फक्त १० धावा दिल्या. आणि तिथेच मुंबईला चांगली सुरुवात न मिळाल्यामुळे धावगतीच्या बाबतीत मुंबईची मागे पडत गेली. त्यातच जम बसलेल्या नमन धीरचा (Naman Dhir) बळीही दिग्वेशने (Digvesh Rathi) मिळवला. पण, मैदानावरील कामगिरी अशी खणखणीत असताना दिग्वेशने नकोशा गोष्टीसाठीची लक्ष वेधून घेतलं. नमन धीरने (Naman Dhir) २४ चेंडूंत ४६ धावा केल्या असताना दिग्वेशने त्याला त्रिफळाचित केलं. त्यामुळे तो बळी महत्त्वाचा होताच. पण, धीर बाद झाल्यावर दिग्वेशने ज्या पद्धतीने आनंद साजरा केला त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2025, MI vs LSG)

विशेष म्हणजे आधीच्या पंजाबविरुद्धच्या सामन्याच दिग्वेशने (Digvesh Rathi) असाच आनंद साजरा केला होता. फलंदाज बाद झाल्यावर त्याला आक्रमकपणे तंबूचा रस्ता दाखवणे ही चांगली वर्तणूक मानली जात नाही. आणि पंजाब विरुद्ध अशा वागणुकीसाठी दिग्वेशच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. आणि त्याला एक डेमेरिट गुणही बहाल करण्यात आला. असं असताना पुन्हा त्याच पद्धतीने आनंद साजरा केल्यामुळे दिग्वेश आता टीकेचा धनी झाला आहे. (IPL 2025, MI vs LSG)

(हेही वाचा – आता हमाल मिळणार ऑनलाइन ; Western Railway ने सुरू केली ‘पोर्टर ऑन कॉल’प्रणाली)

दिग्वेशला यापूर्वी शिक्षा झाली तेव्हा आयपीएलने आपल्या पत्रकात म्हटलं होतं की, ‘राठीचं वागणं हे आचारसंहितेच्या प्रथम स्तरीय कलमाचा भंग करणारं आहे. भाषा, कृती किंवा हावभाव यातून समोरच्या व्यक्तीकडूनही आक्रमक प्रतिसाद मिळेल आणि प्रकरण चिघळेल अशी शक्यता निर्माण झाल्यास तो पहिल्या स्तराचा गुन्हा समजण्यात येतो.’ पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने (Digvesh Rathi) आपला गुन्हा कबूलही केला होता. तरी पुढच्या वेळेस त्याच्या वागणुकीत फरक पडलेला नाही. (IPL 2025, MI vs LSG)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ४ सामन्यांत तिसरा पराभव, फलंदाज पुन्हा अपयशी )

दिग्वेशच्या या हावभावांनंतर लखनौ संघाचा कर्णधार ऋषभ पंतचा (Rishabh Pant) चेहराही उतरला. त्याने स्पष्टपणे दिग्वेशच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. सलग दुसऱ्या सामन्यात घडलेल्या या प्रकारामुळे दिग्वेशवर (Digvesh Rathi) कारवाई होऊ शकते. (IPL 2025, MI vs LSG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.