-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सनी (MI vs LSG) १० धावांनी थोडक्यात गमावला. पण, या पराभवापेक्षा मोठा धक्का मुंबईला सामन्यापूर्वीच बसला होता. माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) गुडघ्यावर चेंडू बसल्यामुळे तो या सामन्यातून बाद झाला होता. नाणेफेकीच्या वेळी हार्दिकने एका वाक्यात याविषयी माहिती दिली. ‘रोहितच्या गुडघ्याला चेंडू बसला. त्यामुळे तो सामन्यात खेळू शकणार नाहीए,’ असं हार्दिक म्हणाला. तेव्हा रोहितच्या दुखापतीचं स्वरुप कुणाला फारसं माहीत नव्हतं. पण, सामन्याला सुरुवात झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि त्यात सरावानंतर रोहित (Rohit Sharma) तंबूत परतताना दिसतोय. रोहितच्या हातात बॅट आहे. तिचाच आधार घेत तो जिना चढताना दिसतो. शिवाय रोहितला आधार देण्यासाठी मुंबईचा एक युवा खेळाडू बरोबर दिसत आहे. आणि पायरी चढणंही रोहितला कठीण जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे तो विव्हळताना दिसतोय. या व्हिडिओमुळेच चाहत्यांना प्रश्न पडलाय की, रोहितची दुखापत कितपत गंभीर आहे? मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पुढील सामना सोमवारी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. आणि त्या सामन्यात रोहित (Rohit Sharma) खेळू शकेल का हा पुढचा प्रश्न सगळ्यांच्या तोंडी आहे. (IPL 2025, MI vs LSG)
(हेही वाचा – एका विधानसभेत आता तीन मंडल अध्यक्ष, BJP ४५ वर्षांवरील पदाधिकाऱ्यांना देणार डच्चू)
Rohit Sharma struggling with an injured knee. pic.twitter.com/VeCdegK07x
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2025
मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) या हंगामाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. आणि आतापर्यंत ४ सामन्यांतील ३ त्यांनी गमावले आहेत. शिवाय खुद्द रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्मही खराब आहे. आतापर्यंतच्या ३ सामन्यांत त्याने फक्त २१ धावा केल्या आहेत. त्यात पहिल्याच चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तो भोपळाही फोडू शकला नव्हता. त्यानंतर त्याने अनुक्रमे ८ आणि १३ धावा केल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत विल जॅक्स (Will Jacks), रायन रिकलटनच्या (Ryan Rickelton) साथीने सलामीला आला. (IPL 2025, MI vs LSG)
मुंबईचं नशीब मात्र त्यामुळे बदललं नाही. आणि लखनौच्या ८ बाद २०३ धावांचा सामना करताना मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ ५ बाद १९१ धावांची मजलच मारू शकला. आणि मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला. (IPL 2025, MI vs LSG)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community