IPL 2025, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ४ सामन्यांत तिसरा पराभव, फलंदाज पुन्हा अपयशी 

लखनौने मुंबईचा १२ धावांनी पराभव केला.

34
IPL 2025, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ४ सामन्यांत तिसरा पराभव, फलंदाज पुन्हा अपयशी 
IPL 2025, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ४ सामन्यांत तिसरा पराभव, फलंदाज पुन्हा अपयशी 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2025) सुरुवातीच्या टप्प्यात तरी मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांना पुरेशी लय सापडलेली दिसत नाही. लखनौ सुपर जायंट्‌स विरुद्‌ध एकाना स्टेडिअमवर सूर्यकुमार यादव, नमन धर, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी विजयासाठी निकराची झुंज दिली खरी. पण, संघाला गरज असताना नियमितपणे चौकार, षटकार वसूल करण्यात ते कमी पडले. आणि मग २०३ धावांचं आव्हान असताना निर्धारित २० षटकांत फक्त ५ बाद १९१ धावा झाल्या.

रोहीत्या अनुपस्थितीत सलामीला आलेला विल जॅक्स (Will Jacks) (५) आणि रायन रिकलटन (Ryan Rickelton)(१०) झटपट बाद झाल्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद १७ झाली होती. या धक्क्यातून सावरायलाही वेळ लागला. तिथून पुढे चौकार, षटकारांचं प्रमाण कमीच झालं. नमन धीरने (Naman Dhir) २४ चेंडूंत ४६ धावा करत मुंबईचं गाडं रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. यात त्याने ३ षटकारही लागवले. तर सूर्यकुमारने मधल्या फळीत डावाला आकार दिला. त्याने ४३ चेंडूंत ६७ धावा केल्या. तो मैदानात असताना संघाला षटकामागे ११ धावांचीच गरज होती. पण, त्या होण्याची आशाही होती. नमन धरला राठीने त्रिफळाचित केलं. आणि पुढे सूर्यकुमारलाही आवेश खानने बाद केलं. त्यानंतर मुंबईसाठी जलद धावा करणं आणखी कठीण झालं. कर्णधार हार्दिक पांड्याने १६ चेंडूंत नाबाद २८ धावा करत विजयासाठी प्रयत्न केले. पण, ते अपयशी ठरले. आणि मुंबईचा पराभव झाला. गुणतालिकेतही आता मुंबई इंडियन्सची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर लखनौ संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

(हेही वाचा – भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती देण्याचे DCM Eknath Shinde यांचे निर्देश)

लखनौच्या दिग्वेश राठीने (digvesh rathi) आपल्या ४ षटकांत फक्त २१ धावा देत रायन रिकलटनचा (Ryan Rickelton) महत्त्वपूर्ण बळी मिळवला. एरवी फलंदाजांचं वर्चस्व असलेल्या या सामन्यात दिग्वेशची पहिली तीन षटकं निर्णायक ठरली. यात त्याने फक्त १० धावा दिल्या होत्या. शिवाय नमन धीरचा (Naman Dhir) महत्त्वाचा बळीही मिळवला. त्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर आवेश खाननेही (Avesh Khan) शेवटची दोन षटकं शांत डोक्याने टाकली. हीच षटकं लखनौ आणि मुंबई संघातील फरक ठरली.

(हेही वाचा – Waqf विधेयकावरून Sharad Pawar यांच्या भूमिकेबाबत संभ्रम!)

त्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाला मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) पहिल्या फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मिचेल मार्श (६०) आणि ए़डन मार्करम (५३) यांनी संघाला ७६ धावांची सलामी करून दिली. त्यानंतर निकोलस पुरन (Nicholas Pooran) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) झटपट बाद झाले असले तरी आयुष बदोणीने ३० धावा आणि डेव्हिड मिलरने २७ धावा करत धावसंख्या २०० च्या पार नेली. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ३६ धावांत ५ बळी घेतले. आयपीएलमध्ये कर्णधाराने डावांत ५ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. लखनौ संघाने आता ४ सामन्यांत २ विजयांसह ४ गुण कमावले आहेत. ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत.

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.