-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध (MI vs LSG) विजय मिळवत दोन गुणांची कमाई केली. आणि गुण तालिकेतही सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. या विजयानंतर संघमालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांचा चेहराही उजळला होता. आधीच्या दोन सामन्यांत लखनौ संघाच्या पराभवानंतर मैदानातच ते आणि कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात झालेली कडक चर्चा लक्षवेधी ठरली होती. आधीच्या हंगामातही तेव्हाचा कर्णधार के एल राहुलबरोबर (KL Rahul) भर मैदानात संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांचे खटके उडले होते. त्यानंतर राहुलने फ्रँचाईजी सोडण्याचा निर्णय घेतला. तर ऋषभ पंतवर (Rishabh Pant) २७ कोटींची बोली लावून गोएंकांनी त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. पण, गोएंका यांचा मैदानातच कर्णधाराशी कठोर शब्दांत चर्चा करण्याचा स्वभाव बदलला नाही. लोकांनाही आता गोएंका यांचा हा स्वभाव अंगवळणी पडला आहे. अशावेळी गोएंका (Sanjiv Goenka) यांनी आता मैदानात खटके उडत असले तरी कर्णधार ऋषभ पंतविषयीच्या (Rishabh Pant) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (IPL 2025, MI vs LSG)
स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वाहिनीशी बोलताना गोएंका (Sanjiv Goenka) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ऋषभ पंतला (Rishabh Pant) त्याचा जुना संघ दिल्ली कॅपिटल्स कायम राखणार नाही, हे समजल्यावर लगेचच आम्ही रणनीती आखली. आमच्या संघाची रचनाच आम्ही ऋषभ पंतला (Rishabh Pant) कर्णधारपदी मानूल आखली. आणि तो एक खंदा कर्णधार आहे, हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी अजून बाहेर यायची आहे, इतकंच. त्याच्यासाठी आम्ही २७ कोटी रुपये मोजले. पण, बोली वर गेली असती तर ही रक्कम २८ किंवा आणखी काही असू शकली असती,’ असं स्पष्ट विधान गोएंका (Sanjiv Goenka) यांनी केलं आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह संघात कधी परतणार, प्रश्नावर हार्दिकचा मोठा अपडेट)
LSG owner Sanjiv Goenka reveals why Rishabh Pant’s fearless approach, leadership, and destructive batting made him the ultimate game-changer! 🔥🏏
Catch LSG SPECIAL, an exclusive conversation with Rishabh Pant & Sanjiv Goenka, only on Star Sports 2 – 4th April at 4:30 PM! 💬🔥… pic.twitter.com/jQAabYZzVv
— Star Sports (@StarSportsIndia) April 4, 2025
(हेही वाचा – Vilas Ujwane : ‘चार दिवस सासूचे’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन)
संघाच्या कर्णधारपदाविषयी बोलताना गोएंका पुढे म्हणाले, ‘कर्णधार कसा हवा हे आमचं ठरलेलं होतं. तो निर्भिड आणि बेडर असावा. त्याने आपल्यातील उर्मी दाबून ठेवता कामा नये. आणि जो आक्रमकपणात कमी नसेल. फार विचार न करता कृतीवर भर देईल आणि नैसर्गिक खेळ करेल, असा कर्णधार आम्हाला हवा होता. तसाच ऋषभ पंत (Rishabh Pant) आहे,’ असं गोएंका (Sanjiv Goenka) म्हणाले.
ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या फलंदाजीच्या खराब फॉर्ममधून जातोय. आधीच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यातही तो २ धावांवर बाद झाला होता. तर मुंबईविरुद्धचा सामना लखनौने जिंकला असला तरी पंत स्वत: २ धावांतच बाद झाला. (IPL 2025, MI vs LSG)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community