
-
ऋजुता लुकतुके
मुंबईच्या वानखेडे मैदानावरील खेळपट्टीने आयपीएलच्या २०व्या सामन्यात जोरदार रंगत भरली. दोन्ही डावांत या खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिली. त्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी फटकेबाजी केल्यामुळे प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता आला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) अर्धशतकांमुळे बंगळुरूने २० षटकांत ५ बाद २२१ अशी धावसंख्या रचली. आणि सुरुवातीला त्यांनी मुंबईला १२ व्या षटकांत ४ बाद ९९ असं रोखलंही होतं. पण, खेळपट्टी बदलली नव्हती. आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya), तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी फटकेबाजी सुरू केल्यावर काही काळासाठी का होईना, सामन्यात चांगलीच रंगत आणली. हार्दिकने तर खेळलेल्या पहिल्या एका षटकांत २ षटकारर आणि ३ चौकार वसूल केले. त्याच्या साथीने तिलक वर्माही (Tilak Verma) बहरला. आणि त्यानेही फटकेबाजी सुरू केली. त्यामुळे पुढच्या ५ षटकांतच मुंबईने तब्बल ७५ धावा वाढवल्या. (IPL 2025, MI vs RCB)
तिलक वर्माने (Tilak Verma) आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गेल्या सामन्यात मुंबई संघ प्रशासनाने त्याला धावा वाढवता न आल्यामुळे निवृत्त केंलं होतं. त्याच तिलकने यावेळी २९ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. १८ व्या षटकांत भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) त्याला बाद केलं. त्यानंतरच्या षटकांत हेझलवूडच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ४२ धावांवर बाद झाला. त्याने या धावा केल्या त्या १५ मिनिटांत. यात त्याने ४ षटकार आणि ३ चौकार ठोकले. तिलक आणि हार्दिक बाद झाल्यावर मुंबईचं आव्हान काहीसं संपलं. शेवटच्या दोन षटकांत २७ धावांची गरज होती. प्रत्यक्षात १२ धावा त्यांना कमी पडल्या. (IPL 2025, MI vs RCB)
(हेही वाचा – पणदेरी धरणासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर; राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या पाठपुराव्याला यश)
Match 21. Royal Challengers Bengaluru Won by 12 Run(s) https://t.co/Arsodkwgqg #MIvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
फिरकीपटू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) मार बसत असताना जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल या तेज गोलंदाजांनी बंगळुरूसाठी नेटाने गोलंदाजी केली. दयाल आणि हेझलवूड यांना प्रत्येकी २ बळी मिळाले. तर कृणाल पंड्याने (Krunal Pandya) शेवटच षटक नेटाने टाकताना एकूण ४ बळी मिळवले. (IPL 2025, MI vs RCB)
(हेही वाचा – Drunk Driver : दोन दिवसांत २२ दारुड्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल; परवाने होणार रद्द)
घरच्या मैदानावर अजूनही मुंबई इंडियन्सना म्हणावा तसा सूर सापडलेला नाही. नाणेफेकीचा कौल आपल्याबाजूने लागूनही कर्णधार त्यानंतरच्या गोष्टी मनासारख्या घडताना दिसत नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जसप्रीत बुमराहनेही (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन केलं. पण, मुंबईचा संघ बंगळुरूला २०० धावा करण्यापासून रोखू शकला नाही. मूळात त्यासाठी मुंबईचे गोलंदाज बंगळुरूच्या भागिदारी थांबवू शकले नाहीत. फिल सॉल्ट डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल यांनी ९१ धावांची भागिदारी रचली. पड्डिकलने २२ चेडूंत ३७ धावा करताना ३ षटकार ठोकले. त्यानंतर रजत पाटीदार आणि विराटने तर भराभर धावा वाढवताना संघाला दीडशेपार नेलं. विराट कोहली (Virat Kohli) ४२ चेंडूंत ६७ धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदारनेही ३२ चेंडूंत ६४ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरूच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २२१ धावा केल्या. (IPL 2025, MI vs RCB)
बंगळुरूचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे. आणि ६ गुणांसह सरस सरासरीच्या जोरावर त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. (IPL 2025, MI vs RCB)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community