IPL 2025, MI vs RCB : फिल सॉल्ट, टिम डेव्हिड यांनी घेतलेला दीपक चाहरचा झेल, ज्यामुळे सामना मुंबईच्या हातून निसटला

कृणाल पांड्याने समयसूचकता दाखवत अखेरचं षटक टाकलं.

71
IPL 2025, MI vs RCB : फिल सॉल्ट, टिम डेव्हिड यांनी घेतलेला दीपक चहरचा झेल, ज्यामुळे सामना मुंबईच्या हातून निसटला
IPL 2025, MI vs RCB : फिल सॉल्ट, टिम डेव्हिड यांनी घेतलेला दीपक चहरचा झेल, ज्यामुळे सामना मुंबईच्या हातून निसटला
  • ऋजुता लुकतुके

सोमवारी मुंबई इंडियन्सनी या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवत मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांच्या अर्धशतकांमुळे बंगळुरूने ५ बाद २२१ अशी चांगली धावसंख्या वानखेडे मैदानावर रचली होती. आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली असली तरी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी मुंबईसाठी काही काळ विजयाची आशा निर्माण केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणी पकडलेले झेल यामुळे बंगळुरूने हा सामना जिंकला. यातील शेवटच्या षटकातील एक झेल चांगलाच लक्षवेधी होती. (IPL 2025, MI vs RCB)

दीपक चाहरने (Deepak Chahar) कृणाल पंड्याचा (Krunal Pandya) हा चेंडू जोरदार टोलावला होता. फिल सॉल्टने (Phil Salt) सीमारेषेवर झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण, चहरने चेंडू जोरदार हाणला होता. आणि तो उंचीने सॉल्टच्या डोक्यावर होता. अखेर त्याने तो झेलला. आणि तोल जातोय असं पाहून त्वरित सीमारेषेच्या आत उभ्या असलेल्या टिम डेव्हिडच्या (Tim David) हातात दिला. डेव्हिडने झेल पूर्ण करत चहरला बाद केलं. दोघांनी मिळून फक्त सहा धावा नाही वाचवल्या तर सामनाच बंगळुरूकडे खेचून आणला. (IPL 2025, MI vs RCB)

(हेही वाचा – MLA Residence : मुंबईत आकाशवाणी आमदार निवासात कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू)

(हेही वाचा – रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे आदेश)

कृणाल पंड्यानेही (Krunal Pandya) पहिल्या ३ षटकांत जोरदार धुलाई झालेली असताना सामन्याचं अखेरचं षटक त्याने शांत डोक्याने टाकलं. इतकंच नाही तर या षटकात ३ बळीही घेतले. एकूण ४ षटकांत त्याने ४५ धावा देत ४ बळी मिळवले. सुरुवातीला हार्दिक आणि तिलक यांनी धावांचा वेग वाढवला तेव्हा सगळ्यात जास्त मार कृणालला बसला होता. त्याच्या पहिल्या ३ षटकांतच ३९ धावा कुटल्या गेल्या होत्या. पण, शेवटच्या एका षटकांत त्याने कसर भरून काढली. या षटकांत त्याने ६ धावा देत ३ बळी मिळवले. त्यामुळे बंगळुरूचा विजय शक्य झाला. (IPL 2025, MI vs RCB)

हा विजय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी महत्त्वाचा होता. कारण, २०१५ नंतर वानखेडे मैदानावर त्यांनी मिळवेलला हा पहिला विजय ठरला आहे. गेल्या १० वर्षांत सातत्याने त्यांचा पराभव होत होता. दुसरीकडे चौथ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची आयपीएल मोहीम या हंगामातही रुतलेली दिसत आहे. (IPL 2025, MI vs RCB)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.