IPL 2025, MI vs SRH : मुंबई इंडियन्स विजयाच्या वाटेवर परतले, ४ गडी राखून विजय !

IPL 2025, MI vs SRH : मुंबई इंडियन्स विजयाच्या वाटेवर परतले, ४ गडी राखून विजय !

118
IPL 2025, MI vs SRH : मुंबई इंडियन्स विजयाच्या वाटेवर परतले, ४ गडी राखून विजय !
IPL 2025, MI vs SRH : मुंबई इंडियन्स विजयाच्या वाटेवर परतले, ४ गडी राखून विजय !

ऋजुता लुकतुके

यंदाच्या हंगामात आता हळू हळू मुंबई इंडियन्सना (MI vs SRH) सूर गवसत आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांची जोडगोळी अचूक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून देत आहे. आणि जोडीला हार्दिक पांड्याही हुकमी बळी मिळवण्यात यशस्वी होत असल्यामुळे शेवटचे दोन सामने धावांचा पाठलाग करताना मुंबई यशस्वी झाली आहे. आताही सनरायझर्स हैद्राबादला ५ बाद १६२ चेंडूंत रोखून मुंबईने निम्मं काम २० षटकांतच केलं. आधीच्या सामन्यात करुण नायरच्या फटकेबाजीचा बळी ठरलेला जसप्रीत बुमरा यावेळी मात्र आपल्या नेहमीच्या लयीत होता. आपल्या ४ षटकांत त्याने फक्त २१ धावा दिल्या. आणि एक बळीही घेतला. (MI vs SRH)

हेही वाचा-‘पाकिस्तानला ‘PoK’ सोडावेच लागेल’; परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता Randhir Jaiswal यांचे विधान

वानखेडेच्या धिम्या खेळपट्टीवर मुंबईच्या तेज त्रिकुटाने टिच्चून गोलंदाजी केली. अगदी ट्रेव्हिस हेडही फटेकाबाजी करू शकला नाही. आणि त्याने २८ धावा केल्या त्या २९ चेंडूंत. तर अभिषेक वर्माने २८ चेंडूंत ४० धावा केल्या. आणि हेनरिक क्लासेनने ३७ धावा करून संघाला १६० चा टप्पा ओलांडून दिला. बाकी पहिल्या डावावर गोलंदाजांचंच वर्चस्व होतं. विल जॅक्सने ३ षटकांत १४ धावा देत २ बळी मिळवले. (MI vs SRH)

याला उत्तर देताना मुंबईसाठी रोहीत शर्मा आणि रायन रिकलटन यांनी वेगवान सुरूवात करून दिली. ३ षटकांत ३२ धावा फलकावर लावल्यावर रोहीत शर्मा खराब फटका खेळून २६ धावांवर बाद झाला. पण, यात त्याने ३ षटकार खेचले. दुसरीकडे रिकलटनने ३१ धावा केल्या. सुर्यकुमार यादवही १५ चेंडूंत २२ धावा करून बाद झाला. त्याने २ षटकार लगावले. मुंबईकर फलंदाजांनी नियमितपणे षटकार खेचल्यामुळे खेळपट्टी धिमी असली तरी त्यांच्यावर धावा वाढवण्याचं दडपण आलं नाही. आणि भागिदारीही होत राहिल्या. (MI vs SRH)

हेही वाचा- “बाळासाहेब असते तर यांना चाबकाने फटकारलं असतं” ; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर घणाघात

नाही म्हणायला विल जॅक्स आणि सुर्यकुमार बाद झाल्यावर मुंबईचा संघ थोडा अडचणीत येऊ शकला असता. पण, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने डाव सावरला. मुंबईच्या प्रत्येक फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. आणि वेळोवेळी षटकार मारून धावगती आटोक्यात ठेवली. हार्दिक पांड्या विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर मायकेल सँटनरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह मुंबईचे आता ७ सामन्यांतून ६ गुण झाले आहेत. तर सनरायझर्स हैद्राबाद गुण तालिकेत नवव्या क्रमांकावर अडकले आहेत. (MI vs SRH)

हेही वाचा- Cyber Fraud : मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी एकाला अटक

सामन्यात १४ धावांत २ बळी आणि मुंबईकडून सर्वाधिक ३६ घावा करणारा विल जॅक्स सामनावीर ठरला. (MI vs SRH)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.