IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघात जखमी गझनफरच्या जागी मुजीब उर रेहमान

IPL 2025 : मुंबईने मुजीरला २ कोटी रुपये देऊन घेतलं आहे.

51
IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघात जखमी गझनफरच्या जागी मुजीब उर रेहमान
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असतानाच खेळाडूंच्या दुखापती आणि त्यामुळे बदली खेळाडूंची नियुक्ती अशा बातम्या समोर यायला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने ताफ्यातील जखमी खेळाडू गझरफरच्या ऐवजी अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमानला संघात घेतलं आहे. त्याच्यासाठी फ्रँचाईजीने २ कोटी रुपये मोजले आहेत. मुंबईने डिसेंबरमध्ये झालेल्या खेळाडूंच्या मेगा लिलावात १९ वर्षीय गझनफरला ४.८० कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. दुसरीकडे मुजीब विकला गेला नव्हता. (IPL 2025)

(हेही वाचा – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी झापणे हे गुन्हेगारी कृत्य नाही ; Supreme Court चा निर्वाळा)

गेल्या चार वर्षांपासून मुजीबूर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघात स्थान मिळाले नाही. मुजीब २०१८ ते २०२१ दरम्यान आयपीएलचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (पीबीकेएस) साठी तीन हंगाम आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) साठी एक हंगाम खेळला आहे. त्याने १९ आयपीएल सामन्यांमध्ये १९ बळी घेतले आहेत. (IPL 2025)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा दुबईत सराव सुरू, पंतच्या गुडघ्यावर बसला अर्शदीपचा चेंडू)

२०१८ मध्ये, मुजीबने पंजाबसाठी ११ सामन्यांमध्ये १४ बळी घेतले. तर २०२१ मध्ये त्याला हैदराबादकडून फक्त एकच सामना मिळाला. त्यात त्याने २९ धावा देऊन दोन बळी घेतले. तेव्हापासून तो लिलावांत विक्रीशिवाय राहिला होता. पण, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकन लीग एसए२० मध्ये तो खेळला आणि तिथे पार्ल रॉयल्सकडून खेळताना १२ सामन्यात षटकामागे फक्त ६.७७ धावा देत त्याने १४ बळी टिपले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी तो एक होता. मुजीबने डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. मुंबईकडून खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मुजीबने म्हटलं आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.