
-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने २०२५ च्या आयपीएल (IPL 2025) हंगामासाठी आपली जर्सी लोकांसमोर आणली आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहता वर्गाला कौतुकाने पलटन असं संबोधलं जातं. आणि असा मुंबई पलटनसाठी संघाचा कर्णधार हार्दिकचा एक संदेश प्रसारित करण्यात आला आङे. त्यात हार्दिकने लोकांना, ‘चलाभेटू, वानखेडाला’ अशी हाक दिली आहे. हार्दिक पांड्याबरोबरच रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे मुंबईचे इतर महत्त्वाचे खेळाडूही या अधिकृत व्हिडिओत मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) नवीन जर्सी घालून दिसतात.
‘मुंबई पलटन, २०२५ ही आपल्यासाठी एक संधी आहे, फ्रँचाईजीची परंपरा पुनर्स्थापित करण्याची. निळ्या व सोनेरी रंगातील जर्सी घालून मुंबईसारखी कामगिरी करण्यासाठी आम्ही मैदानात उतरू. आम्ही तुम्हाला वचन देतो. चला भेटू, वानखेडेला!’ असं हार्दिकने या संदेशात म्हटलं आहे.
(हेही वाचा – Accident News : मजूरांच्या टेम्पोला ट्रकची भीषण धडक ; ७ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी)
View this post on Instagram
(हेही वाचा – अजमेर दर्गा हे शिवमंदिर, Mahashivratri 2025 ला पूजा करण्याची परवानगी द्या; हिंदु सेनेची मागणी)
आयपीएलच्या २०२५ च्या हंगामाचं वेळापत्रक जारी झालं आहे. आणि यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्जशी (CSK) २३ मार्चला म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी होणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे संघ लीगमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. दोन्ही फ्रँचाईजींनी ही स्पर्धा प्रत्येकी पाचवेळा जिंकली आहे. चेन्नईतील चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. (IPL 2025)
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गेल्या हंगामात ऐनवेळी कर्णधार पद रोहीतकडून काढून घेऊन ते हार्दिक पंड्याकडे सोपवलं. आणि त्यामुळे फ्रँचाईजीचे चाहते या निर्णयावर नाखुश होते. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सीमारेषेजवळ आला किंवा नाणेफेरीसाठीही आला तरी त्याची हूर्यो उडवली जात होती. तर मुंबई संघाची मैदानावरील कामगिरीही घसरली. आणि केवळ एका विजयासह संघ तळाला राहिला. या अपयशानंतर मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवलं जाईल असा अंदाज होता. पण, फ्रँचाईजीने ते अजूनही हार्दिककडेच कायम ठेवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community