IPL 2025 उद्घाटन आणि सांगता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर, २१ मार्चपासून सुरुवात

IPL 2025 : आयपीएलचा अंतिम सामना २५ मे ला होणार आहे

31
IPL 2025 उद्घाटन आणि सांगता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर, २१ मार्चपासून सुरुवात
IPL 2025 उद्घाटन आणि सांगता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर, २१ मार्चपासून सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या अठराव्या हंगामाचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. आणि त्यानुसार गतविजेत्या कोलकाता नाईट राडडर्सच्या घरच्या मैदानावर म्हणजे ईडन गार्डन्सवर यंदा आयपीएलचं उद्घाटन आणि सांगताही होणार आहे. २१ मार्च ते २५ मे या कालावधीत यंदा आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. गेल्यावर्षी जेद्दाह इथं आयपीएलचा लिलाव पार पडला तेव्हा बीसीसीआयने संघ मालकांना हंगामासाठी १४ मार्च ते २५ मे असा कालावधी सांगितला होता. पण, आता नेमकेपणाने हे वेळापत्रक आखण्यात आलं आहे. क्रिकबझने ही बातमी दिली आहे. (IPL 2025)

(हेही वाचा- Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्याची विदेशी नागरिकांना भुरळ; रशियन, स्पॅनिश, ब्राझील, पोर्तुगाल, आफ्रिकन भाविकांचा समावेश)

चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल थोडी उशिरा सुरू करण्याचं ठरवलेलं दिसतंय. स्पर्धेच्या परंपरेप्रमाणे गतविजेता संघ उद्घाटनाचा सामना आणि अंतिम सामनाही भरवणार आहे. तर गेल्या हंगामातील उपविजेते हैद्राबाद सनरायझर्स दोन्ही प्ले ऑफचे सामने भरवतील. हे सामने हैद्राबादच्या उप्पल मैदानावर होतील. (IPL 2025)

रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक मुंबईत झाली. यात आयपीएलच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पण, ही बैठक मुख्यत्वे कार्यकारिणीच्या निवडीसाठी होती. आणि आता देवजित साकिया यांची सचिवपदी तर प्रभतेज भाटिया यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे कार्यकारिणी पूर्ण झाली असून ही नवीन कार्यकारिणी आता अधिकृतपणे हे वेळापत्रक जाहीर करेल. उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे. (IPL 2025)

(हेही वाचा- BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)

तर चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवडही १८ तारखेला होईल असं शुक्ला यांनी सांगितलं आहे. (IPL 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.