IPL 2025 : व्हीलचेअरवरून खेळपट्टीची पाहणी करणारा राहुल द्रविड सोशल मीडियावर व्हायरल

IPL 2025 : राहुल द्रविड दुखापतीमुळे कुबड्या घालून वावरत आहे.

86
IPL 2025 : व्हीलचेअरवरून खेळपट्टीची पाहणी करणारा राहुल द्रविड सोशल मीडियावर व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल स्पर्धेपूर्वीच राहुल द्रविडला दुखापत झाली आणि त्याच्या डाव्या पायाला प्लास्टर करावं लागलं. त्यानंतर तो कुबड्या आणि शक्य असेल तिथे व्हीलचेअरवरून फिरत आहे. राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुलने संघाबरोबरच्या आपल्या जबाबदारीतही खंड पाडलेला नाही. तो संघाच्या सरावाच्या ठिकाणी अनेकदा कार्टमधून फिरतो. त्याच्या या कृतीने त्याने उपस्थितांचं आणि सोशल मीडियावरही चाहत्यांचं मन जिंकलं आहे. (IPL 2025)

तसंच आता राजस्थान विरुद्ध चेन्नई या गुवाहाटीत झालेल्या सामन्यापूर्वीचा राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत राहुल चक्क व्हीलचेअरवरून खेळपट्टीची पाहणी करताना दिसतोय. आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेसाठीच राहुल द्रविड ओळखला जातो. आताही त्याचा हाच स्वभाव समोर येत आहे. त्यामुळे त्याचं कौतुकही होतंय. (IPL 2025)

(हेही वाचा – “…अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्क वाढीला सामोरे जा” ; Donald Trump यांची इराणला थेट धमकी !)

इतकंच नाही तर द्रविडने संघाच्या सरावातही भाग घेतला आणि खेळाडूंबरोबर तो चर्चा करताना दिसला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना रविवारी गुवाहाटीत पार पडला. विशेष म्हणजे राजस्थान संघाने आपली दोन पराभवांची मालिका यात खंडित केली. चेन्नईचा मोठा पराभव करत त्यांनी दोन गुण वसूल केले आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने दुसरी फलंदाजी घेतली. राजस्थानने धिम्या दिसणाऱ्या खेळपट्टीवर ९ बाद १८२ अशी धावसंख्या उभारली. (IPL 2025)

नितिश राणाने फक्त ३६ चेंडूंत ८१ धावा केल्या. यात त्याने ५ षटकार लगावले. तर रायन परागने ३७ धावा केल्या. अश्विन आणि जेमी ओव्हरटन यांना षटकारांचा सर्वाधिक मार बसला. ओव्हरटनच्या दोन षटकांत तर ३० धावा नितिशने वसूल केल्या. त्यानंतर यंदा फॉर्मात असलेला रचिल रवींद्र डावाच्या चौथ्याच चेंडूवर बाद झाला. चेन्नईचा पाठलाग कोलमडला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतक करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ती झुंज एकाकी ठरली. चेन्नईने यंदा मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला असला तरी बंगळुरू आणि राजस्थान विरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.