IPL 2025 : राहुल द्रविड आता इलेक्ट्रिक व्हीलचेअरमधून मैदानात

बंगळुरूमध्ये एक स्थानिक सामना खेळताना द्रविडचा पाय दुखावला आहे.

53
IPL 2025 : राहुल द्रविड आता इलेक्ट्रिक व्हीलचेअरमधून मैदानात
IPL 2025 : राहुल द्रविड आता इलेक्ट्रिक व्हीलचेअरमधून मैदानात
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचा (IPL 2025) अठरावा हंगाम आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals)  मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) संघाचा एकही सराव चुकवायचा नाही. पाय दुखावलेला असताना आणि चालताना कुबड्यांचा आधार घ्यावा लागत असताना राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या जयपूरमध्ये संघाबरोबर मैदानात आहे. आणि तो फिरण्यासाठी चक्क इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा आधार घेत आहे. त्याचे असे व्हीडिओ फक्त राजस्थान संघाचे चाहतेच नाही तर देशभर सगळीकडे व्हायरल झाले आहेत. द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघात खेळत असतानाही त्याची संघाप्रती कटीबद्धता प्रसिद्ध होती. आताही त्याचा तोच गुण पुढे येत आहे.

द्रविडच्या काही चाहत्यांनी व्हायरल केलेल्या या व्हिडिओत तो एका नेट्समधून दुसऱ्या नेट्समध्ये व्हीलचेअरवरून फिरताना दिसत आहे. काही चाहत्यांनी द्रविडच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी त्याचं कौतुक केलं आहे. तो लवकर बरा होण्यासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

(हेही वाचा – Manipur Violence: चुराचांदपूरमध्ये हिंसाचार; एक ठार, अनेक जखमी)

(हेही वाचा – अनेक राज्ये रेशनकार्डचा वापर दिखाव्यासाठी करतात; दारिद्र्य रेषेखालील लोकांपर्यंत फायदे पोहोचतात का? Supreme Court चा सवाल)

राहुल द्रविड (Rahul Dravid) २०१४ पासून राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)  संघाशी जोडलेला आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या भारतीय संघातील उदयाचं श्रेयही द्रविडला दिलं जातं. आयपीएल (IPL 2025) सुरू होण्यापूर्वी कर्नाटक क्रिकेटमध्ये एक क्लबस्तरीय सामना खेळताना द्रविडला ही दुखापत झाली आहे. आपला मुलगा अन्वयबरोबर तो ५२ वर्षीय राहुल विजयनगर क्लबसाठी मैदानात उतरला. आणि त्याने अन्वयबरोबर त्याने ४३ धावांची भागिदारी जरुर केली. पण, त्या दरम्यान त्याला पायाची ही दुखापत जडली.

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ जयपूरमध्ये सध्या हंगामपूर्व शिबिरासाठी जमला आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखाली संघ नवीन हंगामासाठी तयार होत आहे. राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकला होता. पण, त्यानंतर २०२२ मध्ये गाठलेली अंतिम फेरी सोडली तर फ्रँचाईजीच्या नावावर मोठी कामगिरी नाही. यंदा २३ तारखेला राजीव गांधी स्टेडिअमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध संघ आपला पहिला साखळी सामना खेळणार आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.