IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यावर पावसाचं सावट, पश्चिम बंगालमध्ये ऑरेंज अलर्ट

शुक्रवारी तर ईडन गार्डन्सचं मैदान पूर्णपणे झाकलेलं होतं.

40
IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यावर पावसाचं सावट, पश्चिम बंगालमध्ये ऑरेंज अलर्ट
IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यावर पावसाचं सावट, पश्चिम बंगालमध्ये ऑरेंज अलर्ट
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2025) अठराव्या हंगामाला शनिवारी २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आणि पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान रंगणार आहे. पण, या सामन्यावर पावसाचं जोरदार सावट आहे. एकूणच पश्चिम बंगालच्या काही शहरांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटनाचा सोहळाही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रंगणार आहे. पण, या हवामानाचा अंदाज पाहता पावसामुळे यातील काही होण्याची शक्यता कमीच आहे.

शुक्रवारी कोलकात्यातील वातावरण पूर्णपणे ढगाळ होतं. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंड्समननी पूर्ण मैदान झाकून ठेवलं होतं. अगदी खेळपट्टी आणि आऊटफिल्डही झाकलेलं होतं. उद्घाटनाच्या सोहळ्यात दिशा पटाणीसह (Disha Patani) लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि पंजाबी गायक करण औलुजा (Karan Aujla) आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. (IPL 2025)

(हेही वाचा – Defence Ministry कडून ५४,००० कोटींच्या लष्करी साहित्याच्या खरेदीला हिरवा कंदील)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पूर्वेला ओडिशातून सुरु होणारा कमी दाबाचा पट्टा विदर्भापर्यंत पसरला आहे. ओडिशातून (Odisha) विदर्भाच्या दिशेनं जोरदार वारे वाहणार आहेत. बंगाल उपसागरात यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांत त्यामुळे मध्यम ते तीव्र स्वरुपाची वृष्टी होऊ शकते. याशिवाय वीजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचीही शक्यता आहे. हिमालयाचा पायथा, सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये २० आणि २१ मार्च या दोन दिवशी मुसळधार पाऊस होऊ शकतो. (IPL 2025)

कोलकात्यातील स्थानिक हवामान विभागानेही २० ते २२ मार्च दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.