-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामाचं विजेतेपद पटकावणारा संघ म्हणून राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएलमध्ये एक वेगळी ओळख आहे. शेन वॉर्न आणि राहुल द्रविड यांनी या संघाला सुरुवातीच्या काळात ओळख मिळवून दिली. आणि अलीकडे संजू सॅमसन ही धुरा पुढे नेत आहे. या फ्रँचाईजीने २०२५ हंगामासाठी नवीन जर्सीचं अनावरण नुकतंच जयपूरला केलं. विशेष म्हणजे या जर्सीचं डिझाईन जोधपूरमधील एका फॅशन डिझाईनिंग स्कूलमधील मुलांनी केलं आहे. राजस्थान रॉयल्सची ओळख जगभरातील स्टार खेळाडूंनी नाही तर देशातील युवा खेळाडूंनी तयार केली आहे. तेच या फ्रँचाईजीचं वैशिष्ट्य आहे. स्थानिक खेळाडूंमधून हिरे निवडणारा संघ म्हणून संघाची ओळख आहे. ही ओळख जपत फ्रँचाईजीने यंदा स्थानिक डिझायनर मुलांना जर्सी बनवण्याची संधी दिली. (IPL 2025)
(हेही वाचा- PM Narendra Modi यांच्या घराविषयीचा फेक व्हिडिओ आपकडून प्रसारित; अलिशान घरातील वस्तूंच्या दाखवल्या किमती)
राहुल द्रविड आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या जर्सीचं अनावरण केलं. जयपूर शहराची ओळख भारताचं गुलाबी शहर अशी आहे. त्यामुळे ‘२०२५ चा गुलाबी रंग असा असेल,’ असं म्हणत संघाने नवीन जर्सीचं ऐलान केलं आहे. (IPL 2025)
Designed in Rajasthan, For Rajasthan. The Pink of 2025 is here. 🔥💗 pic.twitter.com/1yADw3zcqY
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 29, 2025
या जर्सीवर विजयस्तंभ आहे. चित्तोडगडमधील ऐतिहासिक विजयाचा मानबिंदू असलेला हा विजयस्तंभ आहे. तर रजपूत राजा राणा कुंभच्या काळात मिळवलेला विजय हा रजपूत एकीकरणाचं प्रतीक मानला जातो. आणि राजस्थान रॉयल्स संघाचं गमकही ‘अनेकतामें एकता,’ असंच असल्यामुळे संघातील खेळीमेळीचं वातावरण यातून समोर येतं, अशी या जर्सीची संकल्पना असल्याचं संघ प्रशासनाने म्हटलं आहे. (IPL 2025)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : आयसीसी सीईओंच्या राजीनाम्यामागे पाकिस्तानची अकार्यक्षमता? चॅम्पियन्स करंडकासाठी अपुऱ्या तयारीने गोंधळ )
२००८ साली फारसे मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू नसताना राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला वहिला हंगाम जिंकला होता. आणि त्यानंतरही हा संघ अव्वल चार संघांमध्ये गणला जातो. २०२४ साली संघ उपान्त्य फेरीत स्पर्धेतून बाद झाला होता. २०२५ हंगामात संजू सॅमसन संघाचा कर्णधार असणार आहे. (IPL 2025)
हेही पहा-