-
ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB BT CSK) यांच्या दरम्यानचा सामना हा दक्षिण भारतीय डर्बी म्हणून ओळखला जातो. आणि विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंमधील लढत म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. पण, बाकी या दोन संघांमध्ये झालेले तब्बल २३ सामने चेन्नईनेच जिंकले आहेत. त्यांचंच या सामन्यांवर निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. विराट कोहलीलाही या संघाविरुद्ध फारशा धावा करता आलेल्या नाहीत. पण, या हंगामातील सामना मात्र वेगळा होता. एक नाणेफेकीत ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) मिळवलेला विजय सोडला तर चेन्नईच्या बाजूने काहीच घडलं नाही. एकतर कर्णधार ऋतुराजसह त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी सोपे किमान अर्धा डझन झेल सोडले. बंगळुरूच्या फलंदाजांना एरवीही आक्रमक फलंदाजी करू दिली. (IPL 2025, RCB BT CSK)
त्यामुळे कर्णधार रजत पाटीदारने ( Rajat Patidar) एकट्यानेच अर्धशतक पार करून ५१ धावा केल्या. तरी बाकीच्यांनी फटकेबाजी सुरूच ठेवून धावा जमवण्याचं काम यथोचित केलं. फिल सॉल्टने ३२, विराटने ३१, देवदत्त पड्डिकलने २७ धावा आणि त्याही वेगात जोडत बंगळुरूचा धावफलक सतत हलता ठेवला. शेवटच्या षटकांत टीम डेव्हिडने सलग तीन षटकार ठोकून बंगळुरूला २०० च्या जवळही आणलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९६ धावा केल्या. या डावांत एकूण १२ षटकार होते. (IPL 2025, RCB BT CSK)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील गरीब, गरजू महिला आचारसंहितेमुळे यंत्रसामुग्रीला मुकल्या; आता झाला मार्ग मोकळा)
Match 8. Royal Challengers Bengaluru Won by 50 Run(s) https://t.co/I7maHMvZOk #CSKvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेत खांदेपालट; उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या बंपर बदल्या)
चेन्नईत दुसऱ्या डावातील फलंदाजी तुलनेनं सोपी असते. कारण, रात्री पडणाऱ्या दवामुळे चेंडूवर पकड मिळवणं गोलंदाजांना कठीण जातं. दुसरी फलंदाजी करणारा संघ इथं जिंकला आहे. पण, यावेळी तिथंही चेन्नईचं बिनसलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारच्या अचूक गोलंदाजीने त्यांना जखडलं. राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांना हेझलवूडने एकाच षटकांत बाद केलं. पाठोपाठ दीपक हूडा ४ धावांवर बाद झाल्यावर चेन्नईची अवस्था ५ षटकांत ३ बाद २६ झाली. आणि तिथून ती कधी सुधारलीच नाही. (IPL 2025, RCB BT CSK)
रचिन रवींद्रही ४१ धावा करून बाद झाला आणि चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं. तळाला येऊन धोणीने १६ चेंडूंत ३० धावा केल्या. पण, तोपर्यंत लढत संपलेली होती. अखेर बंगळुरूने ५० धावांनी हा सामना जिंकला. जोश हेझलवूडने २१ धावांत ३ बळी मिळवले. तर यश दयाल (Yash Dayal) आणि लिव्हिंगस्टोननेही प्रत्येकी २ बळी घेतले. बंगळुरूने आता आपले दोन पैकी दोन सामने जिंकले आहेत. (IPL 2025, RCB BT CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community