IPL 2025, RCB vs RR : मैदानावरील पंचांनी खेळ थांबवून हेटमायर आणि सॉल्टची बॅट का तपासली?

बॅट आयपीएलच्या नियमांप्रमाणे आहे की नाही हे पंचांनी तपासलं.

96
IPL 2025, RCB vs RR : मैदानावरील पंचांनी खेळ थांबवून हेटमायर आणि सॉल्टची बॅट का तपासली?
IPL 2025, RCB vs RR : मैदानावरील पंचांनी खेळ थांबवून हेटमायर आणि सॉल्टची बॅट का तपासली?
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) दरम्यानचा सामना सुरू असताना एक विचित्र प्रसंग घडला. शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) फलंदाजीसाठी मैदानात आल्या आल्या पंचांनी आधी त्याची बॅट तपासून पाहिली. त्यांच्याकडे असलेल्या एका साच्यात त्यांनी बॅट घालून पाहिली. नंतरच हेटमायरला खेळण्याची परवानगी दिली. १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) बाद झाला होता. आणि त्यानंतर पाचवा फलंदाज म्हणून शिमरॉन (Shimron Hetmyer) मैदानात आला. आणि लगेचच पंचांनी त्याची बॅट तपासण्याची परवानगी त्याच्याकडून मागितली. पंचांकडे असलेल्या ‘बॅटगेज’मध्ये घालून त्याची बॅट तपासण्यात आली. आणि नंतरच हेटमायरला खेळण्याची परवानगी मिळाली.

नंतर असाच प्रकार बंगळुरूचा डाव सुरू झाला तेव्हाही घडली. पंचांनी यावेळी बंगळुरूचा सलामीवीर फिल सॉल्टची (Phil Salt) बॅट तपासून पाहिली. आणि आयपीएलच्या (IPL 2025) नियमांत बॅट बसत आहे असं दिसल्यावर सॉल्टला ती वापरण्याची परवानगी पंचांकडून मिळाली. आयपीएल लीगच्या नियमावलीत खेळण्यासाठी नेमकं कसं वातावरण हवं याचं वर्णन करणारे नियम ५.७ या कलमांत नमूद करण्यात आले आहेत. आणि त्यात बॅटची लांबी, रुंदी आणि जाडी नेमकी किती हवी हे सांगण्यात आलं आहे. (IPL 2025, RCB vs RR)

(हेही वाचा – Energy and Resource : जर्मनीला मागे टाकत भारत बनला पवन आणि सौर ऊर्जेचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक !)

फलंदाजाची बॅट पंचांकडे असलेल्या बॅटगेजमधून आरपार गेली पाहिजे. तशी ती गेली नाही तर त्यासाठी संघाचे किंवा फलंदाजांचेही गुण कापून घेण्यात येत नाहीत. किंवा त्यांना ताकीदही मिळत नाही. फक्त फलंदाजांना बॅट बदलायला सांगितलं जातं. हँडलसह बॅटची एकूण उंची ही ३८ इंचांपेक्षा जास्त असता कामा नये.

आयपीएलचे बॅटविषयीचे नियम काय सांगतात,

जाडी – ४.२५ इंच

खोली – २.६४ इंच

कड – १.५६ इंच

एकूण बॅटच्या लांबीत हँडलची उंची ५२ टक्क्यांपेक्षा मोठी असता कामा नये. जागतिक स्तरावर तसंच देशांतर्गत स्पर्धांमध्येही बॅटविषयीचे हे नियम अस्तित्वात आहेत. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये आधीपासून त्यांचं कडक पालन होतं. आणि गेल्या हंगामातच इसेक्स विरुद्ध नॉटिंगहॅमशायर (NOTTS vs ESSEX) सामन्यात इसेक्सच्या खुशी फिरोझ (Feroze Khushi) या फलंदाजाला या नियमासाठी बॅट बदलावी लागली होती. पंचांना त्याची बॅट वेगळी असल्याचं लक्षात येईपर्यंत त्याने २१ चेंडूंत २७ धावा केल्या होत्या. इंग्लिश काऊंटी नियमांनुसार, इसेक्स संघावर या चुकीसाठी कारवाई करण्यात आली. आणि त्यांचे १२ गुण कमी करण्यात आले. (IPL 2025, RCB vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.