-
ऋजुता लुकतुके
रोहित शर्मा क्रिकेटच्या बाहेर आपल्या कुटुंबीयांमध्ये रमतो आणि त्यांच्याबरोबरच आपला उर्विरत वेळ घालवताना दिसतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो आपली पत्नी रितिका आणि मुलांबरोबरचे फोटो अनेकदा शेअर करतो. आता रोहित शर्मा पुढचा दीड महिला आयपीएलमध्ये व्यस्त असणार आहे आणि यंदाही तो मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध तो भोपळाही न फोडता बाद झाला. पण, या सामन्यापूर्वीच्या सरावाचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि तो एका कारणामुळे व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत रोहितने जे ग्लव्ह्ज घातले आहेत, त्यावर ‘एसआरए’ ही अद्याक्षरं कोरलेली आहेत. रोहितच्या ग्लव्ह्जवर हे काय लिहिलंय असा प्रश्नच व्हिडिओत विचारण्यात आला आहे. त्याच्या चाहत्यांनी अचूक उत्तरंही दिलं आहे. रोहितने समायरा, आहान आणि रितिका अशी आपली मुलगी, मुलगा आणि पत्नीची नावं त्यावर कोरून घेतली आहेत.
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रोहित शून्यावर बाद; नावावर नकोसा विक्रम)
ROHIT SHARMA’s BATTING GLOVES:
SAR – Samaira, Ahaan, Ritika 🤍 pic.twitter.com/oaIEB9rqrM
— Johns. (@CricCrazyJohns) March 22, 2025
रोहित शर्माने अलीकडेच भारतीय संघाला चॅम्पियन्स करंडक आपल्या नेतृत्वात जिंकून दिला आहे. टी-२० विश्वचषकापाठोपाठ चॅम्पियन्स करंडक जिंकून लागोपाठ दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा मान कर्णधार म्हणून त्याने पटकावला आहे. तर चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध रोहित सामना जिंकून देणारी धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता तो आयपीएल खेळायला सिद्ध झाला आहे. टी-२० प्रकारात रोहितने आंतरराष्ट्रीय निवृत्ती पत्करली असली तरी एकदिवसीय आणि कसोटीतही रोहित संघाचं नेतृत्व करत राहणार आहे.
मुंबई इंडियन्सनी आपला पहिला सामना चेन्नईविरुद्ध गमावला आहे. मुंबईची दुसऱ्या सामन्यात आता गाठ गुजरात टायटन्सशी पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community