-
ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातही मुंबई इंडियन्स संघात कप्तानीवरून गोंधळ सुरूच आहे. मुंबई इंडियन्सच्या काही कट्टर चाहत्यांचा पाठिंबाही रोहित शर्मालाच दिसत आहे. तर संघ प्रशासनाने अगदी खमकेपणाने हार्दिक पांड्याला पाठिंबा दिला आहे. त्यातच संघ मालक नीता अंबानींचा या संदर्भातील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्या शिर्डी इथं श्रीसाईबाबा यांच्या दर्शनाला गेल्या असताना एका चाहत्याने त्यांना हात जोडून विनंती केली की, त्यांनी रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करावं. यावर नीता यांनी चाहत्याकडे हसून एक कटाक्ष टाकला. हा व्हिडिओ क्षणातच व्हायरल होत आहे. (IPL 2025, Rohit Sharma)
मुंबई इंडियन्स संघ प्रशासनाने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यावरच विश्वास दाखवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोघांचेही आवाज ऐकू येत आहेत. चाहता अंबानींना हात जोडून म्हणतो, ‘रोहित को कप्तान बनाओ!’ यावर नीता अंबानी म्हणतात, ‘बाबा की मर्जी!’ या हंगामातही मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली नाही. ६ पैकी फक्त दोन सामने त्यांना जिंकता आले आहेत. मुंबईत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध तर दिल्लीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांनी विजय मिळवला. बाकी, बंगळुरू, गुजरात, चेन्नई आणि लखनौ संघांकडून त्यांचा पराभव झाला आहे. (IPL 2025, Rohit Sharma)
(हेही वाचा – मुंबईत पहिली Vedic School सुरु; मुलांची आध्यात्मिक विकासासह शैक्षणिक प्रगती होणार)
Man was demanding captaincy for Rohit Sharma in front of Nita Ambani. This is madness.💀 pic.twitter.com/dCbdVuQZJu
— Gems of Cricket (@GemsOfCrickets) April 13, 2025
या मुंबई इंडियन्स संघात राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केलेले तब्बल ५ खेळाडू आहेत. हार्दिकने भारतीय संघाचं टी-२० प्रकारात पूर्वी नेतृत्व केलं आहे. तर सूर्यकुमार यादव सध्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. याशिवाय माजी कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही पूर्वी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तर परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा मायकेल सँटनर देखील सध्याचा किवी कर्णधार आहे. संघ प्रशासनाने मात्र गेल्या हंगामातील खराब कामगिरीनंतरही हार्दिकच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. (IPL 2025, Rohit Sharma)
रोहित शर्मचा फॉर्मही या हंगामात चांगला नाही. आतापर्यंतच्या ६ सामन्यांत त्याने ११ धावांच्या सरासरीने फक्त ४६ धावा केल्या आहेत. तर २०२३ पासून रोहितची सरासरी आहे २३ धावांची. दुसरीकडे, हार्दिक पांड्याला गेल्यावर्षी कर्णधार केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ केवळ एका विजयासह तळाला राहिला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यावर दडपण आहे. मुंबईचा संघ आता पुढील दोन सामने हैद्राबाद आणि चेन्नईविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. (IPL 2025, Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community