-
ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्सचा नियमित कर्णधार संजू सॅमसन आता बोटाच्या दुखापतीतून सावरला आहे. पूर्णवेळ यष्टीरक्षण करता यावं यासाठी बीसीसीआयची परवानगी त्याला हवी आहे. त्यासाठी त्याने बंगळुरूची क्रिकेट अकादमी गाठली आहे. संजू सॅमसनच्या उजव्या बोटाचं हाड मोडलं होतं. त्यानंतर दुखापतीतून तो आता सावरला असला तरी तो अजून यष्टीरक्षण करत नाहीए. राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये सॅमसन फक्त फलंदाज म्हणून खेळला. संघाचं नेतृत्वही रियान परागने केलं. ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण केलं. पण, आता संजू सॅमसन तंदुरुस्तीच्या प्रमाणपत्रासाठी क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे. (IPL 2025)
क्रिकेट अकादमीतील डॉक्टर संजू सॅमसनच्या दुखऱ्या बोटाची तपासणी करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. पुढील दोन दिवस संजू सॅमसन बंगळुरूतच असणार आहे. सध्या संजू सॅमसनला पूर्ण सामना खेळण्याची परावनगीही बीसीसीआयने अजून दिलेली नाही. त्यामुळे तीनही सामने तो निव्वल फलंदाज, ते ही इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळला आहे. फक्त फलंदाजी पुरता तो मैदानात उतरतो. (IPL 2025)
(हेही वाचा – IPL 2025, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम, एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय)
🚨 REPORTS 🚨
Sanju Samson has gone to the BCCI Centre of Excellence to seek clearance for wicket-keeping duties in IPL 2025. 🏆🏏#SanjuSamson #RR #Rajasthan #IPL2025 pic.twitter.com/FmL6cYCuwL
— Sportskeeda (@Sportskeeda) March 31, 2025
पहिल्या तीन सामन्यांत त्याने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध ६६, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १३ आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २० धावा केल्या आहेत. ‘राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना सात दिवसांनी आहे. तोपर्यंत संजू सॅमसनला संपूर्ण सामना खेळण्याची परवानगी मिळेल अशी राजस्थान फ्रँचाईजीला आशा आहे. तसं झालं तर कप्तान म्हणूनही तो वापसी करेल,’ असं सूत्रांनी सांगितल्याचं क्रिकबझ या वेबसाईटने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. (IPL 2025)
राजस्थान रॉयल्सनी आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांत पहिले दोन सामने गमावले आहेत आणि शेवटचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना जिंकला आहे. राजस्थानचा संघ इथून पुढे दोन सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानांवर खेळणार आहे. ५ एप्रिलला त्यांचा मुकाबला पंजाब किंग्ज इलेव्हनशी पंजाबमध्ये होणार आहे. तर ८ एप्रिलला अहमदाबाद इथं गुजरात टायटन्सशी त्यांनी गाठ पडणार आहे. गुणतालिकेत हा संघ सध्या दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community