आयपीएल 2025 (IPL 2025) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी आयपीएल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) फायनलनंतर 12 दिवसांनी सुरू होत आहे. यंदाचा आयपीएलचा हंगाम 23 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार आहे. आयपीएलचा पहिला सामना 23 मार्च रोजी KKR विरुद्ध RCB असा पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर स्टेडियमवर (Eden Gardens Stadium) हा सामना होणार आहे. यावेळी एकूण 74 सामने 13 वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. (IPL 2025)
IPL 2025 SCHEDULE. pic.twitter.com/QpEQ7DcE9d
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2025
चेन्नई आणि मुंबई कधी ?
IPL 2025 चा सर्वात मोठा सामना 23 मार्च रोजी होणार आहे. या दिवशी आयपीएलमधील दोन सर्वात मोठे संघ भिडणार आहेत. 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांमध्ये दोन लढती होतील. २० एप्रिल रोजी दुसरा सामना होणार आहे. (IPL 2025)
७४ सामने ६५ दिवसांत
बाद फेरीतील २३ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर २ चे आयोजन देखील कोलकातामध्येच केलेले आहे. त्याशिवाय, बाद फेरीतील इतर दोन प्ले-ऑफ सामने, २० मे रोजी क्वालिफायर १ आणि २१ मे रोजी एलिमिनेटर, हे सामने २०२४ चे उपविजेते सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजे हैदराबादमध्ये होतील. या हंगामात एकूण ७४ सामने ६५ दिवसांत खेळले जातील. १२ डबल-हेडर असतील आणि सामने १३ शहरांमध्ये खेळले जातील – १० यजमान शहरे तसेच गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाळा येथे खेळले जातील. (IPL 2025)
मोठा बदल
दरवर्षी आयपीएलचा पहिला सामना गेल्या मोसमात फायनल खेळणाऱ्या दोन संघांमध्ये व्हायचा, पण यंदा तो होताना दिसत नाही. मागील हंगामाच्या म्हणजेच IPL 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला होत. परंतु IPL 2025 चा पहिला सामना KKR आणि RCB यांच्यात होणार आहे. (IPL 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community