IPL 2025 : शेन वॉर्नने जेव्हा रवींद्र जडेजाला बसमधून बाहेर काढलं होतं…

IPL 2025 : जडेजाला शिस्तीचं महत्त्व पटवण्यासाठी वॉर्नने हे कृत्य केलं होतं.

88
IPL 2025 : शेन वॉर्नने जेव्हा रवींद्र जडेजाला बसमधून बाहेर काढलं होतं...
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न धोरणी कर्णधार म्हणूनही प्रसिद्ध होता. ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करण्याची त्याची संधी हुकली. पण, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि पुढे मार्गदर्शक म्हणून त्याने एक काळ गाजवला. आयपीएलला 2008 मध्ये सुरुवात झाली. यावेळी आयपीएलच्या पहिल्या हंगामातच शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने करंडक पटकावला होता. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत असताना आलेले अनुभव शेन वॉर्नने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. त्यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचा खास उल्लेख केलाय. ‘माय स्टोरी, विदाऊट द स्पिन,’ असं शेन वॉर्नच्या आत्मचरित्राचं नाव आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Maharashtra Bhushan पुरस्कार जाहीर!; शिल्पकार राम सुतार यांचा होणार सन्मान)

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मोठं नाव बनलंय. मोठ्या संघर्षानंतर रवींद्र जडेजाला क्रिकेटमध्ये यश मिळालं. दरम्यान, रवींद्र जडेजाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्याला परिपक्व बनवणाऱ्या लोकांमध्ये शेन वॉर्नचा देखील समावेश आहे. रवींद्र जडेजाला शिस्तीचे धडे शेन वॉर्ननेच दिले होते. शेन वॉर्नने ‘माय स्टोरी, विदाऊट द स्पिन,’ या त्याच्या आत्मचरित्रात जडेजाचं खूप कौतुक केलंय. शेन वॉर्न लिहितो, रवींद्र जडेजा फार उत्साही आहे. मात्र, त्याला शिस्त नव्हती. त्याला शिस्त नसणे हे आमच्या टीमची मोठी समस्या बनली होती. युवा खेळाडूंना शिस्त नसणे हे चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. आम्ही त्याच्या काही गोष्टी दुर्लक्ष केल्या. मात्र, कोणत्याही बाबतीत उशीर करणाऱ्या व्यक्तीला आम्ही सहन करु शकत नव्हतो. (IPL 2025)

(हेही वाचा – Malvika Bansod : सायना, सिंधूनंतर मालविका बनसोड क्रमवारीत पहिल्या २५ जणींमध्ये दाखल)

शेन वॉर्न पुढे लिहितो, “रवींद्र जडेजा नेहमी उशीरा यायचा. सुरुवातील बॅग आणि साहित्य असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यावेळी आम्ही बसमधून सकाळी 9 वाजता रवाना झालो होतो. तेव्हा तो बसमध्ये नव्हता. त्यामुळे त्याला स्वत:ला मैदानावर यावं लागलं आणि त्यामुळे पुन्हा उशीर झाला. ट्रेनिंगनंतर परत येत असताना मी मध्येच बस थांबवली आणि म्हणालो मित्रांनो आज सकाळी कोणी उशीरा आले? रवी मित्रा खाली उतर आणि चालत हॉटेलकडे ये…मात्र, त्यांच्या एका मित्राने गोंधळ घातला. त्यालाही मी बसच्या बाहेर काढले. मात्र, त्यानंतर कोणीही कधी उशीरा आले नाही.” (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.