IPL 2025, SRH vs RR : राजस्थानच्या जोफ्रा आर्चरची आयपीएलमधील सर्वात महागडी गोलंदाजी

IPL 2025, SRH vs RR : आर्चरने ४ षटकांत एकूण ७६ धावा दिल्या.

58
IPL 2025, SRH vs RR : राजस्थानच्या जोफ्रा आर्चरची आयपीएलमधील सर्वात महागडी गोलंदाजी
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सनरायझर्स हैद्राबादने निर्धारित २० षटकांत ६ बाद २८६ धावा केल्या. आयपीएलमधील ही आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. तिथपर्यंत पोहोचताना हैद्राबादच्या फलंदाजांनी जोफ्रा आर्चर या राजस्थानच्या कसलेल्या गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. आर्चरच्या ४ षटकांमध्ये तब्बल ७६ धावा निघाल्या. आयपीएलमधील हा एक नकोसा विक्रम आहे. ४ षटकं पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज आता आर्चर ठरला आहे. यापूर्वी मोहीत शर्माने गुजरात टायटन्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ षटकांत ७३ धावा दिल्या होत्या. (IPL 2025, SRH vs RR)

आर्चरने पॉवरप्लेमध्ये टाकलेल्या पहिल्याच षटकांत ट्रेव्हिस हेडने २३ धावा वसूल केल्या आणि त्यानंतर धुलाई थांबलीच नाही. त्याच्या गोलंदाजीवर ४ षटकार आणि १० चौकार निघाले. त्याने फक्त एक निर्धाव चेंडू टाकला. या सामन्यात एकही बळी मिळाला नाही. (IPL 2025, SRH vs RR)

(हेही वाचा – Israel च्या हवाई हल्ल्यात पत्नीसह हमासचा सर्वोच्च नेता बर्दावील ठार)

आयपीएलमधील महागडे गोलंदाज : 
  • जोफ्रा आर्चर (राजस्थान वि. हैद्राबाद) – ०/७६
  • मोहीत शर्मा (गुजरात वि दिल्ली) – ०/७३
  • बसिल थंपी (हैद्राबाद वि. बंगळुरू) – ०/७०
  • यश दयाल (गुजरात वि. कोलकाता) – ०/६९
  • रिकी टॉपली (बंगळुरू वि. हैद्राबाद) – ०/६८
  • ल्युक वूड (मुंबई वि. दिल्ली) – ०/६८

(हेही वाचा – नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंड Faheem Khan याच्या घरावर फिरवला बुलडोझर)

एकूणच सनरायझर्स हैद्राबाद संघाने आक्रमक फलंदाजी करताना या सामन्यात निर्धारित २० षटकांत ६ बाद २८७ धावा केल्या. यात ईशान किशनने ४७ चेंडूंत नाबाद १०६ धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेडनेही ३१ चेंडूंत ६७ धावा केल्या. नितिश कुमार (३०) आणि हेनरी क्लासेल (३४) यांनीही भराभर धावा वाढवल्यामुळे संघाने अडिचशेच्या वर आरामात मजल मारली. याला उत्तर देताना राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन (३७ चेंडूंत ६६) आणि ध्रुव जुरेल (३५ चेंडूंत ७०) धावा करत चांगली झुंज दिली. पण, आधाडीच्या फलंदाजांचं अपयश संघाला महागात पडलं. कारण, हेटमेअर (२३ चेंडूंत ४२) आणि शुभम दुबे (११ चेंडूंत ३४) यांनी शेवटी आक्रमक फलंदाजी केली असली तरी २८२ धावांचं आव्हान पार करणं कठीण होतं. शेवटी संघाला ४४ धावा कमी पडल्या. (IPL 2025, SRH vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.