IPL 2025, SRH vs RR : पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद २८५ च्या पार; ईशान किशनच्या ४७ चेंडूत १०५ धावा

IPL 2025, SRH vs RR : आयपीएलमधील ही दुसरा सर्वोच्च धावसंख्या आहे.

56
IPL 2025, SRH vs RR : पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद २८५ च्या पार; ईशान किशनच्या ४७ चेंडूत १०५ धावा
  • ऋजुता लुकतुके

हंगाम सुरू होताना यंदा एका डावांत ३०० धावा बघायला मिळतील का, अशी चर्चा सुरू होती त्यात सनरायझर्स हैद्राबादकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सध्याची जागतिक स्तरावरील सगळ्यात स्फोटक सलामीची जोडी आणि त्या पाठोपाठ ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्यामुळे हैद्राबाद ही किमया करू शकेल असं सगळ्यांना वाटलं होतं. हाच संघ पुन्हा एकदा ३०० धावांच्या जवळ पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबादने पहिली फलंदाजी करताना ६ बाद २८६ धावांचा डोंगर उभा केला. (IPL 2025, SRH vs RR)

गेल्याच हंगामात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ३ बाद २८७ धावा केल्या होत्या. त्यानंतरची आयपीएलमधील आणि त्यांची वैयक्तिकही ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अभिषेक शर्माने ११ चेंडूंत २४ धावा करत त्यांना चांगली सुरुवात करून दिली. तो लवकर बाद झाला. पण, त्यानंतर ट्रेव्हिस हेडने गोलंदाजी फोडणं सुरू ठेवलं. त्याने ३१ चेंडूंत ६७ धावा करताना ९ चौकार आणि ३ षटकार खेचले. यावेळी हेडच्या साथीने मैदानावर होता डावखुरा ईशान किशन. त्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि नाबाद १०६ धावा केल्या त्या फक्त ४७ चेंडूंत. यात त्याने ६ षटकार आणि ११ चौकार लगावले. हैद्राबादच्या डावांत एकूण १२ षटकारांची आतषबाजी झाली. मैदानावर उतरलेल्या अभिषेक शर्मा आणि अभिनव मनोहर यांचा अपवाद वगळता प्रत्येक फलंदाजाने किमान एक षटकार लगावला. (IPL 2025, SRH vs RR)

हैद्राबादच्या फलंदाजांच्या सरबत्तीत राजस्थानच्या गोलंदाजांची पार धुलाई झाली. जोफ्रा आर्चरच्या ४ षटकांमध्ये तर ७४ धावा निघाल्या. एकटा तुषार देशपांडे ४४ धावांत ३ बळी मिळवत प्रभावी ठरला. आयपीएलमधील संघाच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पाहूया, (IPL 2025, SRH vs RR)

(हेही वाचा – कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करत आहोत, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार ; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा)

  • ३/२८७ – सनरायझर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (बंगळुरू, २०२४)
  • ६/२८६ – सनरायझर्स हैद्रबाद वि. राजस्थान रॉयल्स (हैद्राबाद, २०२५)
  • ३/२७७ – सनरायझर्स हैद्राबाद वि. मुंबई इंडियन्स (हैद्राबाद, २०२४)
  • ७/२७२ – कोलकाता नाईट राडयर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (विशाखापट्टणम, २०२४)
  • ७/२६६ – सनरायझर्स हैद्राबाद वि. दिल्ली कॅपिटल्स (नवी दिल्ली, २०२४)
  • ५/२६३ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पुणे वॉरियर्स (बंगळुरू, २०२३)

(हेही वाचा – Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून…)

राजस्थान रॉयल्सनी या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, संजू सॅमसन (३७ चेंडूंत ६६) आणि ध्रुव जुरेल (३५ चेंडूंत ७०) यांचा अपवाद वगळता मोठी धावसंख्या राजस्थानकडून होऊ शकली नाही. मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे राजस्थानचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद २४२ पर्यंत मजल मारू शकला आणि त्यांचा ४४ धावांनी पराभव झाला. (IPL 2025, SRH vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.