ऋजुता लुकतुके
दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यांत विराटने २७ धावांची खेळी साकारली. आणि या दरम्यान त्याने आयपीएलमध्ये तब्बल १,००० वेळा चेंडू सीमापार धाडला आहे. यात ८२० चौकार आणि २८० षटकारांचा समावेश आहे. घरच्या मैदानावर खेळताना विराटने २ षटकार आणि १ चौकार ठोकला. विराटच्या पाठोपाठ शिखर धवन आहे. आणि त्याच्या नावावर ९२० षटकार आणि चौकार आहेत. म्हणजेच विराट कोहली प्रतिस्पर्ध्यांच्या खूप पुढे आहे. (Virat Kohli)
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार व षटकार
१००१ – विराट कोहली
९२० – शिखर धवन
८९९ डेव्हिड वॉर्नर
८८५ – रोहीत शर्मा
विराटने (Virat Kohli) अलीकडेच आयपीएलमध्ये ८,१९० धावा पूर्ण केल्या आहेत. आणि सध्या तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दिल्लीविरुद्धची विराटची खेळी मात्र अर्ध्यातच संपुष्टात आली. १४ चेंडूंत २२ धावा केल्यावर युवा फिरकीपटू विपराज निगमने त्याला बाद केलं. निगमचा लेगब्रेक चेंडू ड्राईव्ह करण्याची हुक्की विराटला आली. आणि लाँगऑनवर मिचेल स्टार्कने अचूक झेल पकडला. विराट बाद झाल्यावर चिन्नास्वामी मैदानावर एकदम सन्नाटा पसरला. (Virat Kohli)
हेही वाचा-Jejuri च्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा
दिल्ली कॅपिटल्सनी नाणेफेक जिंकून बंगलुरूला पहिली फलंदाजी दिली होती. पण, सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे त्यांची अवस्था ७ बाद १२५ अशी झाली होती. टीम डेव्हिडने शेवटी केलेल्या फटकेबाज ३७ धावांमुळे संघाने १६० धावांचा टप्पा ओलांडला. पण, ही धावसंख्या दिल्लीने ४ गडी गमावूनच पार केली. के एल राहुलने नाबाद ८२ धावा केल्या. दिल्लीने स्पर्धेत आपली सलग ४ पराभवांची मालिका कायम ठेवली आहे. गुणतालिकेत आता दिल्ली दुसऱ्या तर बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहेत. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community