-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली प्रत्येक सामन्यापूर्वीच्या त्याच्या तयारीसाठी प्रसिद्ध आहे. आताही चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी विराट गुरुवार आणि शुक्रवारी सकाळीही जोरदार तयारी करत होता. गुरुवारी फ्लड लाईट्समध्ये फलंदाजीचा त्याने सराव केला. तर गुरुवारी उन्हातील फलंदाजीवर त्याचा भर होता. चेन्नई विरुद्ध बंगळुरू हा सामना शुक्रावरी रात्री चेपक मैदानावर होणार आहे. धोनी विरुद्ध कोहली असं या सामन्याकडे पाहिलं जात आहे. (IPL 2025)
आणि सगळ्यांना विराटच्या फलंदाजीची उत्सुकता आहे. बंगळुरू संघाचा मार्गदर्शक दिनेश कार्तिकलाही सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत कोहलीविषयीच प्रश्न विचारण्यात आले. ‘मी इथे पत्रकार परिषदेला येण्यापूर्वीच विराटशी बोललो. तो एका विशिष्ट क्रिकेट फटक्याचा सराव करत असल्याचं तो मला म्हणाला. कारकीर्दीत इतकं उंच चढल्यानंतर तो एका नवीन फटक्यासाठी असा सराव करत आहे. त्याच्या या स्वभावाविषयीच मला नेहमी आदर वाटत आलेला आहे,’ असं कार्तिकने सुरुवातीला सांगितलं. (IPL 2025)
(हेही वाचा – BCCI : बीसीसीआयच्या वार्षिक करारांची लवकरच घोषणा, श्रेयस अय्यरची अ श्रेणीत वापसी?)
खरंतर कोहली चेन्नईविरुद्ध तितकीशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. यापूर्वी दुबईत झालेल्या आयपीएल हंगामात त्याने चेन्नईविरुद्ध ५२ चेंडूंत नाबाद ९० धावांची खेळी केली होती. हीच त्याची चेन्नईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी आहे. पण, चेन्नईत चेपक मैदानावर त्याची सर्वोत्तम धावसंख्या फक्त ५३ इतकी आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट जेमतेम ११३ चा आहे. त्यामुळे कोहलीच्या फिरकीला खेळण्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कार्तिकने मात्र ही गोष्ट फेटाळून लावली. (IPL 2025)
‘अगदी अलीकडे फिरकीविरुद्घ खूप चांगली कामगिरी केली आहे. दुबईत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताकडून तो दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी फलंदाज होता. त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फिरकीलाही चांगलं खेळतोय. या आधी तो जितका चांगलं खेळायचा तितकाच तो आजही खेळतोय,’ असं कार्तिकने ठासून सांगितलं. (IPL 2025)
(हेही वाचा – ऑक्सफर्डमध्ये Mamata Banerjee यांच्या भाषणावेळी गोंधळ; आंदोलकांनी आरजी कर कॉलेज बलात्कार प्रकरणावरून दीदींना घेरले)
चेन्नईत या सामन्यासाठी सरासरी ३२ अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल असा अंदाज आहे. दोन संघांच्या आधी झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नईने बंगळुरू विरुद्ध तब्बल २१ सामने जिंकले आहेत. कुठल्याही आयपीएल फ्रँचाईजीने एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मिळवलेले हे सगळ्यात जास्त सामने आहेत. तर धोनीने ३३ सामन्यांमध्ये बंगळुरू विरुद्ध ८६४ धावा केल्या आहेत. एकाच संघाविरुद्ध या सर्वाधिक धावा आहेत. यावेळी चेन्नईकडून रचिल रवींद्रा चांगला फॉर्मात आहे. तर बंगळुरूकडून विराट आणि फिल सॉल्ट हे सलामीवीर फॉर्मात आहेत. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community