IPL 2025, Virat Kohli : ३६ वर्षांचा विराट जेव्हा ४ धावा पळून काढतो…

पंजाब विरुद्ध विराटने चित्ता हे नवीन नाव कमावलं आहे.

58
IPL 2025, Virat Kohli : ३६ वर्षांचा विराट जेव्हा ४ धावा पळून काढतो…
IPL 2025, Virat Kohli : ३६ वर्षांचा विराट जेव्हा ४ धावा पळून काढतो…
  • ऋजुता लुकतुके

पाठलागांचा बादशाह असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात चित्ता ही नवीन ओळख मिळवली आहे. पंजाबच्या १५८ धावांचा पाठलाग करताना तिसऱ्याच षटकात विराट आणि त्याची साथीदार देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी चक्क ४ धावा पळून काढल्या. अर्शदीपचा गुड लेंग्थ चेंडू देवदत्तने मिड विकेटकडे टोलवला. त्यानंतर विराटसह त्याने ४ धावा पळून काढल्या. मुल्लनपूरच्या नवीन मैदानात खेळपट्टीच्या या बाजूला सीमारेषा थोडी दूर आहे. आणि आऊटफिल्ड धिमी आहे. दोनच फलंदाज बाहेर असल्यामुळे त्यांनी धावत येऊन चेंडू अडवेपर्यंत विराट (Virat Kohli) आणि देवदत्त (Devdutt Padikkal) यांनी चौकार वसूलही केला.

प्रेक्षकांनीही विराट आणि देवदत्तच्या चपळाईला दाद दिली. खासकरून विराट ३६ वर्षांचा असल्यामुळे त्याच्या चपळाईचं कौतुक होत आहे. जिओ स्टार (Jiohotstar) वाहिनीवर समालोचकांनी दोघांच्या वेगाचं सिंहावलोकन केलं. यात विराट प्रत्येक धाव २९ किमी प्रती तास, २२ किमी प्रती तास आणि २१ किमी प्रती तास या वेगाने धावल्याचं दिसलं. मैदानातही मोठ्या फलकावर हे आकडे झळकल्यावर लोकांनीही जल्लोष केला. (IPL 2025)

(हेही वाचा – Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीगमध्ये जेव्हा प्रेक्षक फोनवर आयपीएल पाहतात…)

(हेही वाचा – BJP shared a video : विरोधकांची केली बोलती बंद ; “आत्ता कुठे सुरुवात…!” म्हणत भाजपाने व्हिडीओ शेअर करत स्पष्टच सांगितलं)

त्यापूर्वी पंजाब किंग्जनी (PBKS) पहिली फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती. आणि प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी चौथ्या षटकांत ४२ धावांची सलामी दिली होती. पण, त्यानंतर सुशय शर्मा (Suyash Sharma) आणि कृणाल पंड्या यांनी टिच्चून गोलंदाजी करून धावाही रोखल्या आणि प्रत्येकी दोन बळी घेत मधली फळीही कापून काढली. तळाच्या शशांक सिंग (३१) आणि मार्को यानसेन (२५) यांनी पंजाबला दीडशेच्या पार नेलं.

बंगळुरू संघाची सुरुवात खराब झाली असली तरी फिल सॉल्ट (Phil Salt) एका धावेवर बाद झाल्यानंतर विराट आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी १०३ धावांची भागिदारी करत बंगळुरूचा विजय निश्चित केला. दोन्ही संघांदरम्यान अलीकडेच बंगळुरूत झालेला सामना पंजाबने जिंकला होता. आता पंजाबच्या घरच्या मैदानावर बंगळुरूने पराभवाची परतफेड केली आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.