ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये (IPL 2025) सोमवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमने सामने येतील, तेव्हा चाहत्यांसाठी ती एक पर्वणी असेल. एकतर जसप्रीत बुमरा मुंबई संघात परतल्यामुळे बुमराह विरुद्ध कोहली अशी जुगलबंदी सुरुवातीलाच पाहायाल मिळेल. दुसरं म्हणजे भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतील. आणि ते द्वंद्व पाहण्याची उत्सुरता सर्व क्रिकेट रसिकांना आहे. या सामन्याचं औचित्य साधून बंगळुरू संघाने विराट कोहलीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि यात तो रोहीतबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना दिसतो. भारतीय संघात जवळ जवळ १५ वर्षं एकत्र घालवल्यानंतर या सामन्यापूर्वीच्या भावना विराटने अगदी मनमोकळेपणाने बोलून दाखवल्या आहेत. (IPL 2025)
‘आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. आणि आमचं नातंही विशेष असंच आहे. इतकी वर्षं संघात एकत्र खेळल्यावर ते तर होणारच,’ असं सुरुवातीलाच विराट म्हणतो. तुम्ही एकत्र खेळता, तेव्हा खेळाविषयी तुमची आपापसात चर्चा होते. तुम्ही आपल्याला आलेले अनुभव एकमेकांना सांगता. त्यातून घेतलेला बोधही दुसऱ्याबरोबर शेअर करता. एकमेकांकडून तुम्ही खूप काही शिकता. आणि कारकीर्दीत एकत्र पुढे जाता,’ असं म्हणताना विराटही काहीसा भावनाविवश झाला होता. (IPL 2025)
𝐓𝐡𝐞 𝐑𝐎-𝐊𝐎 𝐛𝐨𝐧𝐝! 🫂
Virat Kohli talks about his equation with Rohit Sharma, and how they’ve bonded over the years and created some wonderful memories! ✨
We’re just a day away from seeing them go up against each other, and we wish them well! 😌👊#PlayBold #ನಮ್ಮRCB… pic.twitter.com/I6GHFHxgEx
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 6, 2025
दोघांचं नातं हे विश्वासाचं असल्याचं विराटने या व्हीडिओत आवर्जून सांगितलं आहे. ‘तुम्ही एकमेकांबरोबर इतकी वर्षं एकत्र खेळता तेव्हा विश्वास तयार होतो. आणि त्यातून असं अनेकदा झालंय की, आम्हाला एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एकमेकांच्या मनातील ओळखता येतं. आणि बरेचदा आम्ही सारखाच विचार करतो. आम्हाला एकसारखाच निर्णय घ्यावासा वाटतो,’ असं मत विराटने व्यक्त केलं आहे. १५ वर्षं एकच ड्रेसिंग रुम शेअर करता आली यासाठी विराट स्वत:ला नशीबवान मानतो. (IPL 2025)
हेही वाचा- IPL आणि घरच्या खेळपट्टीचा वाद !
सध्या विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या स्थानावर अडखळतोय. मुंबईविरुद्ध जिंकल्यास बंगळुरू संघाला पुन्हा तालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. (IPL 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community