-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात कोलकाता फ्रँचाईजीचा तेव्हाचा कर्णधार नितिश राणा खेदाने एक वाक्य बोलून गेला होता, ‘कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधील एकमेव फ्रँचाईजी आहे ज्यांना घरचं मैदान नाही!’ कर्णधार म्हणून राणाने ईडन गार्डन्सवरील क्युरेटर सुजल मुखर्जी यांना केलेली विनंती त्यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे पराभवानंतर नितिश राणाने हे आपला खेद असा व्यक्त केला होता. पुढे जाऊन २०२४ मध्ये कोलकाताने आयपीएल जिंकलीही. पण, ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी आणि क्युरेटरचा वाद तसाच राहिला. (IPL 2025)
‘यजमान संघाच्या मर्जीप्रमाणे खेळपट्टी तयार करण्याला मी बांधील नाही. मी बीसीसीआयकडून आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनक़डून पगार घेतो,’ असं उत्तर मुखर्जी यांनी तेव्हा दिलं होतं. या घटनेनंतर काही दिवसांपूर्वी या प्रसंगाला पुन्हा उजाळा मिळाला तो मुखर्जी यांनी सध्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेची फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीची मागणी धुडकावून लावल्यामुळे. सुजल मुखर्जी यांनी जुनंच उत्तर दिलं. (IPL 2025)
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या पाठिंबाच्या वक्तव्यावर CM Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया काय ?)
Return to Eden 🏡💜 pic.twitter.com/CaZj6gkDsl
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 23, 2025
यंदाही या वाक्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. राहणेनं नाराजी व्यक्त केली. तर न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डूलने कोलकाता संघाने आपलं घरचं मैदानच बदलावं अशी आक्रमक सूचना केली. आता बंगालच्या रणजी संघाचे माजी प्रशिक्षक अरुण लाल यांनीही या वादात उडी घेतली आहे. यजमान संघाला घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा मिळाला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. ‘इंग्लिश संध भारत दौऱ्यावर येतो, तेव्हा बीसीसीआय उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्या बनवते का? किंवा आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला फिरकीला पोषक खेळपट्ट्या मिळतात का? बीसीसीआयसाठी आपल्या गोलंदाजांसाठी धार्जिण्या खेळपट्ट्या बनवणं हेच महत्त्वाचं असणार आहे. आणि तीच अवस्था इतर मंडळांची असेल. त्यामुळेच दौऱ्यांची आणि क्रिकेटची मजा टिकून राहील,’ असं परखड मत अरुण लाल यांनी टाईम्स समुहाशी बोलताना व्यक्त केलं आहे. (IPL 2025)
‘संघात वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन सारखे चांगले फिरकीपटू आहेत. पण, घरच्या मैदानावर पोषक खेळपट्टी मिळाली नाही, तर संघ या दोघांचा उपयोग कसा करून घेणार? त्यामुळे यजमान संघाची बलस्थानं ओळखून तशी खेळपट्टी मिळायला हवी,’ असं त्यांनी परखडपणे सांगितलं. कोलकाता फ्रँचाईजीकडून यापूर्वी खेळलेल्या मनविंदन बिसलानेही हेच मत व्यक्त केलं आहे. आधीच्या सामन्यात समालोचन करताना त्याने आपलं मत मांडलं. ‘फ्रँचाईजी आणि क्युरेटर यांच्याच एकदा चर्चा व्हायला हवी. सगळ्यांनाच लवकरात लवकर बाद फेरी गाठायची आहे. अशा गोष्टी कामगिरीवर परिणाम करतात. त्यामुळे यावर तोडगा निघणं आवश्यक आहे,’ असं बिसला म्हणाला. या मुद्यावर क्रिकेटपटू आणि जाणकार सध्या विभागलेले आहेत. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community