IPL 2025 : आयपीएलचा उद्घाटन सोहळा कुठे पाहता येणार? कसा असेल हा सोहळा?

रंगारंग उद्घाटन सोहळ्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे.

64
IPL 2025 : आयपीएलचा उद्घाटन सोहळा कुठे पाहता येणार? कसा असेल हा सोहळा?
IPL 2025 : आयपीएलचा उद्घाटन सोहळा कुठे पाहता येणार? कसा असेल हा सोहळा?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2025) अठराव्या हंगामाला शनिवारी २२ मार्चला संध्याकाळी एका शानदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात होईल. या सोहळ्याचे तपशीलही आता हाती येऊ लागले आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens)  हा सोहळा रंगणार आहे. स्पर्धेतील दहाही फ्रँचाईजी या सोहळ्यात सहभागी होतील. बॉलिवूड सेलिब्रिटींनी भरलेल्या या कार्यक्रमात दिशा पटाणी (Disha Patani), श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) आणि पंजाबी गायक करण औजला (Karan Aujla) आपली कला सादर करतील.

शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. याशिवाय दोन डावांच्या मध्ये दहा मिनिटंही असाच एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल.

(हेही वाचा – F-47 च्या कोणी आसपास पण फिरकरणार नाही ; Donald Trump यांची सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा)

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांच्याकडून शासनाची कानउघडणी!)

साधारण दीड तासांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा उद्गाटनाचा सामना होईल. या सोहळ्यावर कोलकात्यातील पावसाचं सावट आहे. पण, लोकांनी उत्साहाने तिकीट खरेदी केली आहे. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे तपशील जाणून घेऊया,

उद्घाटन सोहळा कधी? शनिवारी २२ मार्चला संध्याकाळी सहा वाजल्यापासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर (Eden Gardens) उद्घाटनाचा सोहळा रंगणार आहे.

हा सोहळा टीव्ही, इंटरनेटवर दिसेल का? हो. जिओस्टार कंपनीकडे या उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रसारणाचे हक्क आहेत. आणि जिओ तसंच स्टारच्या सर्व व्यासपीठांवर हा सोहळा दिसू शकेल. अगदी मोबाईलवरही जिओस्टार ॲपवर तुम्हाला उद्घाटन सोहळा आणि सर्व सामने पाहता येतील.

सोहळ्यात कुठले कार्यक्रम असतील? आयपीएलच्या (IPL 2025) उद्घाटन सोहळ्यात यंदा श्रेया घोषाल (Shreya Ghoshal), दिशा पटाणी (Disha Patani) आणि करण औजला (Karan Aujla) यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.