IPL 2025 : महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी का करतोय?, स्टिफन फ्लेमिंगने दिलं उत्तर

IPL 2025 : तळाला येऊन घणाघाती फलंदाजीसाठी धोनी ओळखला जातो.

73
IPL 2025 : महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी का करतोय?, स्टिफन फ्लेमिंगने दिलं उत्तर
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यांत महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तोपर्यंत चेन्नईसाठी आव्हान खडतर झालेलं होतं. पण, धोनीने ११ चेंडूंत १६ धावा करत तळाला चांगला प्रतिकार केला. मोक्याच्या क्षणी एक चौकार आणि षटकार ठोकत त्याने चेन्नईसाठी काही काळ विजयाची आशाही निर्माण केली होती. आतापर्यंत धोनी सातव्या ते नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. यात दोनदा त्याने फटकेबाजी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळेच चेन्नईच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, धोनी सातव्या क्रमांकाऐवजी मधल्या फळीत फलंदाजीला का येत नाही. तिथे त्याची फटकेबाजी संघाला जास्त उपयोगी पडेल, असाच विचार यामागे आहे. चाहत्यांच्या या प्रश्नाला आता चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी उत्तर दिलं आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – गोंधळलेले Raj Thackeray; महापालिका निवडणुकीआधी मनसेची दिशाहीनता कायम)

४३ वर्षीय धोनीला वयोमानानुसार, त्याचे गुडघे आता त्रास देतात. त्यामुळे तो १० – १२ षटकं फलंदाजी करू शकेल इतका तंदुरुस्त नाही. शिवाय तो २० षटकं यष्टीरक्षण करतो. त्यामुळे तो तळाला फलंदाजीला येतो. धोनी स्वत:च त्याच्या तंदुरुस्तीचं चांगलं अवलोकन करू शकतो. तो त्यानुसार संघ प्रशासनाला वेळोवेळी विश्वासात घेतो. राजस्थानविरुद्ध संघाला गरज असताना त्याने सातव्या क्रमांकावर खेळण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतो,’ असं सांगत फ्लेमिंग यांनी हा प्रश्न निकालात काढला. (IPL 2025)

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : तीन वर्षात हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक)

धोनी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर त्याला एकेरी – दुहेरी धावा जास्त पळाव्या लागतील. तो ताण आता त्याला सतत सहन होणारा नाही, असं फ्लेमिंग यांचं म्हणणं आहे. ‘१३ किंवा १४ व्या षटकांत फलंदाजी करायची असेल तर ठिक आहे. ते सुद्धा आम्ही त्यालाच विचारू की, तो करू शकेल का? पण, त्या आधी फलंदाजी करायची असेल तर थोडा विचार करावा लागतो. धोनी आमच्यासाठी अतिशय मौल्यवान खेळाडू आहे. खेळाडूंना मार्गदर्शन, यष्टीरक्षण सगळं तो करतो. त्याचा वापर जपूनच व्हायला हवा,’ असंही फ्लेमिंग यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. धोनीनेही मागच्याच सामन्यानंतर आपल्या बदललेल्या भूमिकेचा उल्लेख केला होता. इतरांना संधी देऊन नवीन संघ घडवण्याची वेळ आला आली असल्याचं धोनी तेव्हा म्हणाला होता. त्यामुळे आधीच्या हंगामासारखाच धोनी आता सहाव्या किंवा त्यानंतरच्या क्रमवारीवर फलंदाजीला येणार हे निश्चित आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.