-
ऋजुता लुकतुके
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर म्हणजे दुबईत होणार आहे. १९ डिसेंबर ही लिलावाची तारीख आधीच निश्चित झाली होती. (IPL Auction 2024)
यापूर्वी आयपीएल स्पर्धा ही भारताबाहेर खेळवली गेली आहे. पण, यंदा पहिल्यांदाच स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा लिलाव देशाबाहेर दुबईत होणार आहे. येत्या १९ डिसेंबरला हा लिलाव दुबईतील कोका कोला सेंटरमध्ये पार पडेल. बीसीसीआयने १० संघमालकांना याविषयीची माहिती दिली आहे. तसंच लिलावापूर्वी संघ आपल्याकडे ठेवू इच्छिणाऱ्या खेळाडूंची यादी आत २६ नोव्हेंबरला जाहीर करायची आहे. (IPL Auction 2024)
यापूर्वी ही तारीख १६ नोव्हेंबर होती. पण, तोपर्यंत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलेली नसेल आणि खेळाडूंची तंदुरुस्ती आणि इतर गोष्टींचा आढावा घ्यायला संघांना वेळ हवा होता. लिलावात खर्च करण्यासाठी प्रत्येक संघाला १०० कोटी रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. म्हणजे अख्ख्या लिलावात संघ एकूण इतका खर्च करू शकतात. (IPL Auction 2024)
डिसेंबर हा भारतात लग्नाचा कालावधी आहे. त्यामुळे भारतीय शहरांमध्ये सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करणं कठीण जात होतं. त्यामुळे भारताबाहेर खेळाडूंचा लिलाव घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आयपीएलमधील एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं आहे. (IPL Auction 2024)
(हेही वाचा – Thane : ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमानिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल, कोणत्या रस्त्यांचा वापर कराल?)
IPL AUCTION ON DECEMBER 19 AT DUBAI….!!!
November 26th is the last date for players retention & releases. [Espn Cricinfo] pic.twitter.com/d5CT7iyT7W
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
खेळाडूंचा आयपीएल संघाबरोबरचा करार हा तीन वर्षांसाठीचा असतो. सध्याच्या कराराचं हे तिसरं वर्ष आहे आणि करार संपल्यानंतरचा मेगा लिलाव पुढील वर्षी पार पडेल. गेल्यावर्षी झालेला खेळाडूंचा लिलाव इस्तंबूलमध्ये घेण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला होता. पण, पुढे जाऊन ही योजना रद्द करण्यात आली. (IPL Auction 2024)
आयपीएलमधून एक ताजी बातमी म्हणजे विंडिज तडाखेबंद फलंदाज रोमारिओ शेफर्डला लखनौ सुपरजायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला विकलं आहे. (IPL Auction 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community