- ऋजुता लुकतुके
२१ वर्षीय रॉबिन मिंझसाठी गुजरात टायटन्स संघाने ३.६ कोटी रुपये मोजले. (IPL Auction 2024)
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल लिलावात आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेल्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याचं लक्षात येईल. यातलाच एक आहे २१ वर्षीय रॉबिन मिंझ. झारखंडचा रॉबिन हा आदिवासी भागातून येतो आणि त्याची मूळ किंमत २० लाख रुपये इतकी होती. झारखंडचा असलेला रॉबिन हा अपेक्षेप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे आणि धोनीचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्याच मार्गदर्शनाखाली तो तयार झाला आहे. (IPL Auction 2024)
डावखुरा धडाकेबाज फलंदाज असलेल्या रॉबिनला सगळ्यात आधी मुंबई इंडियन्स संघाने हेरलं होतं. गेल्यावर्षी त्याला क्रिकेट शिष्यवृत्तीवर इंग्लंडला पाठवण्यात आलं. आताही लिलावा दरम्यान रॉबिनवर बोली लावणारा एक संघ होता मुंबई इंडियन्स. पण, अखेर गुजरात टायटन्सची बोली वरचढ ठरली. (IPL Auction 2024)
Robin Minz is next with a base price of INR 20 Lakh.
The uncapped wicketkeeper is SOLD to @gujarat_titans for INR 3.6 Crore 💰🔥#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
(हेही वाचा – Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा)
डावखुरा फलंदाज असलेला रॉबिन हा यष्टीरक्षकही आहे आणि घणाघाती फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. रणजी करंडकात तो अजून खेळलेला नाही. पण, १९ आणि २५ वर्षांखालील संघातून तो झारखंडकडून खेळला आहे. रॉबिनचे वडील सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर रांचीच्या बिसरा मुंडा विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रॉबिनला दोन बहिणीही आहेत. (IPL Auction 2024)
सध्या तो रांची इथं नामकुम भागात राहतो. या आयपीएलमुळे रॉबिनचं भवितव्यच बदलणार आहे. (IPL Auction 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community