IPL Auction 2024 : आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, कुठल्या संघाकडे किती जागा, पैसे शिल्लक?

१९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे

252
IPL Auction 2024 : आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, कुठल्या संघाकडे किती जागा, पैसे शिल्लक?
IPL Auction 2024 : आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, कुठल्या संघाकडे किती जागा, पैसे शिल्लक?

ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2024) १९ डिसेंबरला दुबईत होणार आहे. यात ३३३ खेळाडूंवर १० संघ बोली लावतील. या ३३३ खेळाडूंपैकी, २१४ भारतीय तर ११९ खेळाडू परदेशातले आहेत. २ खेळाडू हे आयसीसीच्या असोसिएट सदस्य देशांतील आहेत. लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंची यादी आयपीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आयपीएलमधील दहाही संघ मिळून एकूण ७७ जागा रिक्त आहेत. आणि यातल्या ३० जागा या परदेशी खेळाडू भरु शकतात. उपलब्ध खेळाडूंपैकी २३ खेळाडूंनी आपली मूळ (IPL Auction 2024) किंमत २ कोटी रुपये निर्धारित केली आहे. तर दीड कोटी रुपयांपासून बोली लागेल असे १३ खेळाडू आहेत. खेळाडूंचा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.

WhatsApp Image 2023 12 12 at 11.17.40 AM
हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.