- ऋजुता लुकतुके
मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सनी २४.७५ कोटी रुपये मोजले आहेत. त्या निमित्ताने बघूया आयपीएलमधील पहिले दहा महागडे खेळाडू.
ऑस्ट्रेलियन संघाने विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला हरवून यंदाचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. शिवाय गेल्यावर्षी बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल खेळले नव्हते. त्यामुळे यंदा ते उपलब्ध आहेत म्हटल्यावर संघांच्या त्यांच्यावर उड्या पडणार हे नक्की होतं. शेवटी झालंही तसंच. आयपीएलच्या २०२४ हंगामासाठी दुबईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात महागडे ठरलेले पाच खेळाडूंपैकी तीन ऑस्ट्रेलियाचे होते.
(हेही वाचा – IPL Auction 2024 : खेळाडूंच्या लिलावात कमिन्स, ब्रूक यांच्यावर लक्ष )
आधी सनरायजर्स हैद्राबादने २०.५ कोटी रुपये मोजून पॅट कमिन्सला विकत घेतलं आणि या व्यवहारानंतर काही तासांतच मिचेल स्टार्कवर कोलकाता नाईट रायडर्सनी २४.७५ कोटी रुपयांची बोली लावली. ट्रेव्हिस हेडवरही साडेसहा कोटी रुपयांची बोली लागली.
मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या अंतिम फेरीतील विजयात चमकला होता. त्याचा वेग आणि चेंडू स्विंग करण्याची कला यामुळे जगातील कुठल्याही खेळपट्टीवर तो घातक ठरू शकतो. शिवाय सध्या तो फॉर्ममध्येही आहे. आणि गरज पडेल तेव्हा चिवट फलंदाजीची क्षमताही त्याने दाखवून दिली आहे. त्यामुळे स्टार्कसाठी बोली चढत गेली. अगदी मुंबई इंडियन्स, चेन्नई, बंगळुरू या फ्रँचाईजीही शर्यतीत होत्या. अखेर कोलकाता नाईट रायडर्सनी इतिहासातील सर्वात मोठी बोली लावून स्टार्कला आपल्या बाजूने वळवलं. स्टार्कसाठी संघ मालकांमध्ये झालेली चडाओढ तुम्ही खालील लिंकमध्ये पाहू शकता.
That’s a GRAND return to the IPL for Mitchell Starc 😎
DO NOT MISS the record-breaking bid of the left-arm pacer who will feature for @KKRiders 💜💪#IPLAuction | #IPL pic.twitter.com/D1A2wr2Ql3
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
स्टार्कवर लागलेल्या बोलीच्या बरोबर एक तास आधी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवरही अशाच कोट्यवधीच्या उड्या पडल्या. अखेर लिलावात नेहमी हात आखडत्या घेणाऱ्या सनरायजर्स हैद्राबादने त्याच्यासाठी २०.५ कोटी रुपयांची बोली लावली. नेतृत्व गुण आणि अष्टपैलूत्व यामुळे कमिन्स कुठल्याही संघाला हवा असाच खेळाडू आहे.
THE BIGGEST IPL BID EVER 😱
HISTORY CREATED here at the #IPLAuction
Australia’s World Cup winning captain Pat Cummins is SOLD to @SunRisers for a HISTORIC INR 20.5 Crore 💰💰💰💰#IPL pic.twitter.com/bpHJjfKwED
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
यंदाच्या लिलावात कुणावर किती बोली लागली ते या बातमीत तुम्ही पाहू शकता (IPL 2024 Auction : पॅट कमिन्स नवीन हंगामाचा सगळ्यात महागडा खेळाडू)
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेले पहिले दहा क्रिकेटपटू
मिचेल स्टार्क – आयपीएल २०२४ – २४.७५ कोटी रु. (कोलकाता नाईट रायडर्स)
पॅट कमिन्स – आयपीएल २०२४ – २०.५ कोटी रु (सनरायजर्स हैद्राबाद)
सॅम करन – आयपीएल २०२३ – १८.५० कोटी रु. (पंजाब किंग्ज)
कॅमेरुन ग्रीन – आयपीएल २०२३ – १७.५० कोटी रु. (मुंबई इंडियन्स)
बेन स्टोक्स – आयपीएल २०२३ – १६.२५ कोटी रु. (चेन्नई सुपरकिंग्ज)
ख्रिस मॉरिस – आयपीएल २०२१ – १६.२५ कोटी रु. (राजस्थान रॉयल्स)
युवराज सिंग – आयपीएल २०१५ – १६ कोटी रु. (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
निकोलस पुरन – आयपीएल २०२३ – १६ कोटी रु. (लखनौ सुपरजायंट्स)
पॅट कमिन्स – आयपीएल २०२० – १५.५० कोटी रु. (कोलकाता नाईट रायडर्स)
ईशान किशन – आयपीएल २०२२ – १५.२५ कोटी रु. (मुंबई इंडियन्स)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community