IPL Brand Value Soars : आयपीएलचं ब्रँड मूल्य १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर, सगळ्यात मौल्यवान फ्रँचाईजी कुठली? 

एका वर्षात २८ टक्के वाढीसह आयपीएल आता डेकाकॉर्न मूल्य असलेली लीग बनली आहे 

265
IPL Brand Value Soars : आयपीएलचं ब्रँड मूल्य १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर, सगळ्यात मौल्यवान फ्रँचाईजी कुठली? 
IPL Brand Value Soars : आयपीएलचं ब्रँड मूल्य १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर, सगळ्यात मौल्यवान फ्रँचाईजी कुठली? 

ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलने डेकाकॉर्न (IPL Brand Value Soars) लीगचा दर्जा मिळवला आहे. म्हणजेच लीगचं मूल्य १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर गेलं आहे. २०२२ ला हे मूल्य ८.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं. ते २८ टक्क्यांनी वाढून आता १०.७ अब्जांवर पोहोचलं आहे.

कंपन्याचं मूल्यांकन करणाऱ्या ब्रँड फायनान्सरिव्हिल या संस्थेनं हा अहवाल सादर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २००८ मध्ये ही लीग सुरू झाल्यापासून या लीगच्या मूल्यांत ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये वाढलेल्या मूल्यासाठी बऱ्याच गोष्टी जबाबदारी आहेत. आयपीएलला मीडिया प्रसारणाच्या हक्कांतून मिळणारी (IPL Brand Value Soars) रक्कम वाढली आहे. लीगमध्ये दोन नवीन फ्रँचाईजी वाढल्यामुळे हा फरक पडला आहे. तर कोव्हिड नंतर स्टेडिअमवर प्रेक्षकांनी पुन्हा गर्दी केल्यामुळे तिकिटाचा महसूलही वाढला आहे.

लीगमधील फ्रँचाईजीबद्गल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सचं ब्रँड मूल्यांकन सगळ्यात जास्त म्हणजे ८७ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. मुंबईने पाचवेळा आयपीएल जिंकली आहे. तर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं मूल्यांकन ८१ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. त्यांनीही पाचदा लीग जिंकली आहे. पहिल्या तिनात असलेले इतर तीन संघ आहेत कोलकाता नाईटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स.

गुजरात टायटन्स फक्त दोनच हंगाम खेळली आहे. पण, दुसऱ्याच वर्षी फ्रँचाईजीचं मूल्य ३८ टक्क्यांनी वाढून ६९.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं झालं आहे. आयपीएल लीगमध्ये खेळणाऱ्या फ्रँचाईजींनी आता परदेशातील लीगमध्येही आपले संघ तयार केले आहेत. आणि त्यामुळे त्याचंही मूल्य झपाट्याने वाढतंय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.