IPL History Highest Score : आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या कुठली माहीत आहे?

IPL History Highest Score : सर्वोच्च धावसंख्येच्या क्रमवारीत पहिल्या ४ धावसंख्या या हंगामातील आहेत

195
IPL History Highest Score : आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या कुठली माहीत आहे?
IPL History Highest Score : आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या कुठली माहीत आहे?
  • ऋजुता लुकतुके 

इंडियन प्रिमिअर लीग हा खरंतर एका डावात २० षटकांचा फॉरमॅट आहे. पण, खेळाचं वैशिष्ट्यच घणाघाती फलंदाजी हे असल्यामुळे इथं फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. त्या प्रयत्नांत अनेकदा धावांचाही डोंगर उभा राहतो. क्रिकेट जगतातील काही रोमहर्षक आणि मोठ्या धावांचा पाठलाग करणारे सामनेही या स्पर्धेत पाहायला मिळाले आहेत.  (IPL History Highest Score)

एकतर दहा फ्रँचाईजींचे दहा संघ असलेल्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या या स्पर्धेत मग एका डावांत अगदी अडीचशे धावाही सहज होतात. त्यातच बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडिअम आणि अगदी मुंबईतील वानखेडे स्टेडिअम ही त्यांच्या तुलनेनं लहान आकारामुळे फलंदाजीचं नंदनवन म्हणून ओळखली जातात. तिथं षटकार अगदी मनाप्रमाणे खेचता येतात.  (IPL History Highest Score)

(हेही वाचा- Jitendra Awhad यांच्याकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान)

 असे उत्तुंग षटकार खेचून अडीचशे पर्यंत धावसंख्या नेलेल्या डावांचा आढावा इथं घेणार आहोत. याच हंगामात आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या अगदी पार २७० धावांच्या पलीकडे गेली आहे. आणि २७० च्या ही पार दोन संघांनी मजल मारली आहे.  (IPL History Highest Score)

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 

यंदाच्या म्हणजे २०२४ च्या हंगामात एक अनोखा विक्रम झाला. स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या ४ सर्वोच्च धावसंख्या या एका हंगामातील आहेत. (IPL History Highest Score)

(हेही वाचा- Mumbai Local Train Update: मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ सेवा ठप्प! )

सनरायझर्स हैद्राबादने सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दोनदा केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चिन्नास्वामी मैदानावर खेळताना त्यांनी ३ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या पाचही फलंदाजांनी किमान ३० धावा केल्या. पण, सामन्याचा हीरो ठरला तो ट्रेव्हिस हेड, ज्याने ४१ चेंडूंत १०२ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ९ चौकार ठोकले. तर हेनरिक क्लासेनने ३१ चेंडूंत ६१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. विजयासाठी २८८ धावांचं लक्ष्य समोर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही चांगली कामगिरी केली आणि ७ बाद २६२ धावांची मजल मारली. दिनेश कार्तिक (८३) मैदानावर होता, तोपर्यंत बंगळुरूला विजयाची आशाही होती. सलामीला विराटने ४२ तर दू प्लेसिसने ६२ धावा केल्या. या एका सामन्यात मिळून ५४९ धावा पाहायला मिळाल्या (IPL History Highest Score)

सनरायझर्स हैद्राबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना केलेली ३ बाद २७७ ही धावसंख्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.. ट्रेव्हिस हेड (६३) आणि अभिषेक शर्मा (६४) यांनी संघाला तडाखेबंद सुरुवात करून दिली. आणि नंतर हेनरिक क्लासेनने कारकीर्दीतील एक सुरेख खेळी साकारताना ३४ चेंडूंत ८० धावा केल्या. मुंबईकडे हार्दिक, जसप्रीत बुमरा, पियुष चावला अशा अनुभवी गोलंदाजांचा ताफा असताना १८ षटकार सनरायझर्सनी धावसंख्या २७७ वर नेली. याला उत्तर देताना मुंबईनेही निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा केल्या. सामन्यात एकूण ५२३ धावा निघाल्या. आणि ३८ षटकार ठोकले गेले.  (IPL History Highest Score)

(हेही वाचा- Amul Milk: अमूल दूध महागलं, लिटरमागे किती रुपयांची झाली वाढ? जाणून घ्या…)

याच हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनीही दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ७ बाद २७२ धावा केल्या. ३९ चेंडूंत ८५ धावा करणारा सुनील नरेन या धावसंख्येचा शिल्पकार ठरला. अंगक्रिश रघुवंशीनेही ५४ धावा केल्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव झाला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. (IPL History Highest Score)

पुन्हा एकदा सनरायझर्स हैद्राबादने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ७ बाद २६६ अशी धावसंख्या उभारली. ट्रेव्हिस हेड (८९) आणि अभिषेक शर्मा (४६) यांनी डावाला आकार दिला. या शिवाय शाहबाझ अहमदने तळाला येऊन ५९ धावा करत धावसंख्या २६० पार पोहोचवली. याला उत्तर देताना दिल्लीचा डाव १९९ धावांत कोसळला. दिल्लीकडून जेक मॅकगुकर्कने ६५ धावा केल्या. पण, त्याला आवश्यक साथ मिळाली नाही. (IPL History Highest Score)

(हेही वाचा- Pune: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी, टोल व्यवस्थापकांनी केले ‘हे’ आवाहन)

सर्वोच्च धावसंख्येचा आयपीएल विक्रम मागची दहा वर्षं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या नावावर होता. २०१३ च्या हंगामात पुणे वॉरिअर्स विरुद्ध ५ गडी बाद २६३ धावा केल्या होत्या. यात ख्रिस गेलचा एकट्याचा वाटा होता १७५ धावांचा. त्या त्याने ६६ चेंडूंमध्ये केल्या. त्यानंतर बंगळुरू संघाने पुण्याला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ वर रोखलं. आणि हा सामना १३० धावांनी जिंकला. गेलच्या झंझावातासाठी हा सामना लक्षात राहील. (IPL History Highest Score)

चेन्नई सुपरकिंग्ज – २८

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २४

मुंबई इंडियन्स – २३

पंजाब किंग्ज – २२

कोलकाता नाईट रायडर्स – २०

राजस्थान रॉयल्स – १८

सनरायजर्स हैद्राबाद – १७

दिल्ली कॅपिटल्स – ११

गुजरात टायटन्स –

लखनौ सुपरजायंट्स –

डेक्कन चार्जर्स –

गुजरात लायन्स –

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.