IPL Mega Auction : रिंकू सिंगच्या एका विधानाची चर्चा, विराटबरोबर बंगळुरू संघात खेळणार?

IPL Mega Auction : यावर्षाच्या शेवटी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे 

124
IPL Mega Auction : रिंकू सिंगच्या एका विधानाची चर्चा, विराटबरोबर बंगळुरू संघात खेळणार?
IPL Mega Auction : रिंकू सिंगच्या एका विधानाची चर्चा, विराटबरोबर बंगळुरू संघात खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या टी-२० संघातला तडाखेबाज फलंदाज रिंकू सिंगने (Rinku Singh) आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावापूर्वी एक बिनधास्त विधान करून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सहा वर्षांपूर्वी रिंकू कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या ताफ्यात सामील झाला. आणि तिथूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. २०२३ साली एका षटकांत ५ षटकार मारत त्याने कोलकाता संघाला अवघड विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून अवघड विजय मिळवून देण्याची त्याची हातोटी लोकांच्या नजरेसमोर आली. त्याच्या जोरावर भारतीय संघातही त्याचा समावेश झाला. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- Hindusthan Post impact : दादरच्या ‘त्या’ रस्त्याचे काम तोडून नव्याने बनवण्यास सुरुवात)

२०१८ मध्ये कोलकाता संघाने ८० लाख रुपयांना रिंकूला विकत घेतलं होतं. आणि तेव्हापासून त्यांनी रिंकूला कायम राखलं आहे. पण, आताच्या लिलावात जर कोलकाताने ठेवून घेतलं नाही, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे (RCB) जायला आवडेल, असं रिंकूने आधीच बोलून दाखवलं आहे. याचं कारण तिथे विराट आहे, असंही त्याने सांगून टाकलं आहे. (IPL Mega Auction)

 कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंगला (Rinku Singh) आयपीएल लिलावात २०१८ मध्ये विकत घेतले होते. मात्र, या खेळाडूला पहिल्या काही मोसमात खेळण्याच्या फार कमी संधी मिळाल्या. पण रिंकू सिंगने ५ चेंडूत ५  षटकार मारून प्रसिद्धी मिळवली. आज रिंकू सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रिंकू सिंहने आतापर्यंत आयपीएलचे ४५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १४३.३४ स्ट्राइक रेट आणि ३०.७९ च्या सरासरीने ८९३ धावा केल्या आहेत. याशिवाय रिंकू सिंगने २ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त २३ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल)

रिंकू सिंग (Rinku Singh) मूळचा उत्तर प्रदेशच्या अलिगडचा आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याचा समावेश पक्का मानला जात असताना मधल्या फळीत अष्टपैलू खेळाडूंना जागा मिळावी यासाठी त्याला आणि शुभमन गिलला राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागलं. आता विराट आणि रोहीतच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ स्थित्यंतरातून जात आहे. अशावेळी रिंकू सिंग मधल्या फळीतील तडाखेबाज फलंदाज म्हणून संघात स्थिरावण्यासाठी उत्सुक आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.