IPL Mega Auction : डेव्हिड वॉर्नर ते पृथ्वी शॉ, लिलावात बोली न लागलेले खेळाडू पाहूया

IPL Mega Auction : केन विल्यमसन, ॲलेक्स केरी यांच्यासह अनेक यशस्वी खेळाडूंकडे फ्रँचाईजींनी पाठ फिरवली.

75
IPL Mega Auction : डेव्हिड वॉर्नर ते पृथ्वी शॉ, लिलावात बोली न लागलेले खेळाडू पाहूया
  • ऋजुता लुकतुके

रविवार आणि शनिवार असे दोन दिवस सौदी अरेबियाची राजधानी जेद्दाह इथं पार पडलेला लिलाव आता संपला आहे. एकूण १८२ खेळाडूंवर १० संघांनी मिळून ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. पण, लिलावासाठी नोंदणी झालेल्या ५०० च्या वर खेळाडूंपैकी जवळपास ३०० खेळाडू विक्रीविना राहिले. म्हणजेच फ्रँचाईजींनी त्यांच्यावर बोली लावली नाही. एकीकडे रिषभ पंतला २७ कोटी रुपये मिळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही यशस्वी खेळाडू आयपीएलच्या पुढील हंगामासाठी संघ मालकांना नको होते.

आणि अशा खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन अशा खेळाडूंचाही समावेश आहे. भारताचा पृथ्वी शॉही या यादीत आहे. यंदा पृथ्वीचा रणजी संघ असलेल्या मुंबईनेही त्याला तंदुरुस्तीसाठी ब्रेक घेण्याचाच सल्ला दिला होता. आयपीएलमध्ये बोली न लागलेले खेळाडू इथं बघूया,

फलंदाजांमध्ये केन विल्यमसन, डेव्हिड वॉर्नर, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ यांच्यावर बोली न लागल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

(हेही वाचा – IPL Mega Auction : २०२४ च्या मेगा लिलावात संघ मालकांनी केली विक्रमी खरेदी)

विक्री न झालेले फलंदाज बघूया,

डेव्हिड वॉर्नर, अनमोलप्रीत सिंग, यश धुल, केन विल्यमसन, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, सर्फराझ खान, माधव कौशिक, पुष्कराज मान, फिन ॲलन, डेवाल्ड ब्रेव्हिस, बेन डकेट, ब्रँडन किंग, पथुम निसंका, स्टिव्ह स्मिथ, सचिन धस, सलमान निझार, लेऊस दी प्लॉय, शिवालिक शर्मा

लिलावाचा एकूण कल पाहता तेज गोलंदाजांना संघ मालकांची पहिली पसंती होती. आणि त्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसली. पण, त्याचवेळी मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात मोठा वाटा उचलणारा तनुष कोटियन, जो भारतीय संघात रवी अश्विनची जागा घेईल असंही बोललं जातं, त्याला संघ मालकांनी नाकारलं. त्याच वेळी पियुष चावलालाही कुणी घेतलं नाही. विक्री न झालेले गोलंदाज बघूया.

(हेही वाचा – Digital Arrest चा धक्कादायक प्रकार; वृद्ध महिलेला एक महिना डिजिटल कोठडी)

विक्री न झालेले गोलंदाज,

वकार सलामखील, कार्तिक त्यागी, पियुष चावला, मुजिबूर रेहमान, विजयकांत वियसकांत, अकील हुसैनी, केशव महाराज, साकीब हुसेन, विद्वथ कावेराप्पा, राजन कुमार, प्रशांत सोळंकी, जाथवेद सुब्रमण्यम, मुझफ्फर रेहमान, नवीन उल हक, उमेश यादव, रिशाद हुसैन, राघव गोयल, बैलापुडी यशवंत, रिचर्ड ग्लीसन, आलझारी जोसेफ, ल्युक वूड, अर्पित गुलेरिया, जेसन बेहरनडॉर्फ, शिवम मावी, नवदीप सैनी, दिवेश शर्मा, नमन तिवारी, ओटनील बार्टमन, दिलशान मधुशंका, ॲडम मिल्ने, विल्यम ओरुर्क, चेतन साकरिया, संदीप वॉरियर, लेन्स मॉरिस, ऑली स्टोन, अंशुमन हूडा, ब्लेसिंग मुझरबनी, विजय कुमार, काईल जेमीसन, ख्रिस जॉर्डन, अविनाश सिंग, प्रिन्स चौधरी

टी-२० क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंची उपयुक्तता मोठी आहे. पण, यंदा लिलावात काही अष्टपैलू खेळाडूही विक्रीविना राहिले. ऑस्ट्रेलियाचा ॲलेक्स केरी हे त्यातीलच एक नाव आहे.

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव संपला, काय आहे १० संघांचं चित्र)

विक्री न झालेले अष्टपैलू खेळाडू,

उत्कर्ष सिंग, शार्दूल ठाकूर, डेरिल मिचेल, मयंक डागर, रिषी धवन, शिवम सिंग, गस ॲटकिनसन, सिकंदर रझा, काईल मेयर्स, मॅथ्यू शॉर्ट, एमनज्योत चहल, मायकेल ब्रेसवेल, अब्दुल बसिथ, राज लिंबानी, शिवा सिंग, ड्वेन प्रिटोरिअस, ब्रँडन मॅक्युलम, अतित शेठ, रोस्टन पटेल, संजय यादव, उमंग कुमार, दिग्विजय देशमुख, यश डाबस, तनुष कोटियन, ख्रिवित्सो केन्स

या व्यतिरिक्त ज्या यष्टीरक्षकांवर बोली लागली नाही, त्यापैकी जिमी बेअरस्टो आणि ॲलेक्स केरी यांचं नाव आघाडीवर घ्यावं लागेल.

(हेही वाचा – Assembly Election 2024: मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार शपथ घेण्याची शक्यता)

विक्री न झालेले यष्टीरक्षक,

जॉनी बेअरस्टो, उपेद्र यादव, शाय होप, के. एस. भरत, ॲलेक्स केरी, अवनीश अरावेल्ली, हार्विक देसाई, जोश फिलीप, एल आर चेथन, तेजस्वी दाहिया

या खेळाडूंवर आता बोली लागली नसली तरी संघ बांधत असताना गरज पडल्यास किंवा आधी विक्री झालेला खेळाडू नंतर अनुपलब्ध झाल्यास या खेळाडूंचा पुन्हा विचार होऊ शखतो. त्या या खेळाडूंसाठीही आयपीएलचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.