IPL Mega Auction : आयपीएल लिलावात आतापर्यंत काय घडलं?

IPL Mega Auction : आयपीएलच्या १० संघांनी आतापर्यंत लिलावात तब्बल ५०० कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

40
IPL Mega Auction : आयपीएल लिलावात आतापर्यंत काय घडलं?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल मेगा लिलाव सध्या सौदी अरेबियात जेद्दाह इथं सुरू आहे आणि पहिल्याच दिवशी रिषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यावर विक्रमी बोली लागल्याचं दिसलं. तसंच १० संघांनी आतापर्यंत ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने रिषभ पंतवर २७ कोटी रुपयांची बोली लावली. तर श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्जनी २६.८० कोटी रुपये मोजले. वेंकटेश अय्यरलाही अनपेक्षितपणे २३.७५ कोटी रुपये मिळून गेले.

आतापर्यंतच्या घडामोडी पाहिल्या तर पंजाब किंग्ज यंदा लिलावात आक्रमक फ्रँचाईजी दिसते आहे. त्यांनी महत्त्वाच्या सगळ्याच खेळाडूंसाठी आक्रमकपणे बोली लावली. त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या ११०.५० कोटी रुपयांपैकी ८८ कोटी त्यांनी पहिल्याच दिवशी खर्च केले आहेत. तर एकूण ६८ खेळाडू आतापर्यंत विकले गेले आहेत आणि ४ खेळाडूंसाठी संघांनी राईट-टू-मॅच कार्ड वापरलं. पहिल्या ११७ खेळाडूंनंतर वेगवान लिलाव होणार आहे, जेव्हा संघ मालकांना त्यांच्या पसंतीच्या खेळाडूवर थेट बोली सुरू करता येईल. त्याचे तपशील अजून कळलेले नाहीत. पण, आतापर्यंतच्या लिलावातील ठळक धडामोडी पाहूया,

(हेही वाचा – तब्बल ३४२ जणांना मिळाली कमी मते; Nawab Malik यांच्यासह मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचा समावेश)

लिलावातील सगळ्यात महाग १५ खेळाडू

रिषभ पंत – २७ कोटी (लखनौ सुपरजायंट्स)

श्रेयस अय्यर – २६.७५ (पंजाब किंग्ज)

वेंकटेश अय्यर – २३.७५ (कोलकाता नाईट रायडर्स)

अर्शदीप सिंग – १८ (पंजाब किंग्ज)

यजुवेंद्र चहल – १७ (पंजाब किंग्ज)

जोस बटलर – १५.७५ (गुजरात टायटन्स)

के. एल. राहुल – १४ (दिल्ली कॅपिटल्स)

ट्रेंट बोल्ट – १२.५ (मुंबई इंडियन्स)

जोफ्रा आर्चर – १२.५ (राजस्थान रॉयल्स)

जोश हेझलवूड – १२.५ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

मोहम्मद सिराज – १२.२५ (गुजरात टायटन्स)

इशान किशन – ११.२५ (सनरायझर्स हैद्राबाद)

जितेश शर्मा – ११ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

टी. नटराजन – १०.७५ (दिल्ली कॅपिटल्स)

भुवनेश्वर कुमार – १०.७५ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

(हेही वाचा – IPL Mega Auction : राईट-टू-मॅच कार्ड वापरूनही दिल्ली कॅपिटल्सला रिषभ पंत का मिळाला नाही?)

कुणासाठी वापरलं राईट-टू-मॅच कार्ड

अर्शदीप सिंग (१८ कोटी, पंजाब किंग्ज)

जेक फ्रेझर-मॅकगर्क (९ कोटी, दिल्ली कॅपिटल्स)

रचिन रवींद्र (४ कोटी, चेन्नई सुपरकिंग्ज)

नमन धीर (५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स)

अननुभवी खेळाडूंमध्ये काश्मीरचा तेज गोलंदाज रसिक धरला आतापर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे ६ कोटी रुपये मिळाले आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या ३७ वर्षीय रवीचंद्रन अश्विनला चेन्नई सुपरकिंग्जनी ९.७५ कोटी रुपये देऊन विकत घेतलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.