- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या २०२५ च्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियात जेद्दाह इथं होणार हे आता स्पष्ट झालं आहे. एकूण १,५७४ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे आणि यातून २०४ खेळाडूंची विक्री अपेक्षित आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये १,१६५ खेळाडू भारतीय आहेत तर ४०९ खेळाडू परदेशी आहेत. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – Imane Khelif : मुष्टियोद्धा इमाने खलीफ पुरुषच असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर, तिला ऑलिम्पिकमध्ये का खेळू दिलं?)
या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी थॉमस ड्राका हे नाव सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण, हा २४ वर्षीय खेळाडू इटलीचा आहे. आणि पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात एखाद्या इटालियन खेळाडूने नोंदणी केली आहे. यापूर्वी कॅनडातील टी-२० लीग तो खेळला आहे आणि इटलीकडूनही ४ टी-२० सामन्यांचा अनुभव त्याच्यापाशी आहे. गोलंदाज असलेला ड्राका मुंबई इंडियन्सच्या एमिरेट्स संघाकडून खेळतो. त्यामुळे कदाचित मुंबई इंडियन्सचं हे धोरण असू शकतं आणि ते ड्राकाला आपल्या ताफ्यात घेऊ शकतात. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)
आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये ४ सामन्यांत ड्राकाने ८ बळी मिळवले आहेत. अष्टपैलू खेळाडू अशी त्याची ओळख आहे. यंदा लिलावात सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक ९१ खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेतून आहेत. तर त्या खालोखाल ७६ ऑस्ट्रेलियान खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. (IPL Mega Auction)
लिलावासाठी नोंदणी केलेले परदेशी खेळाडू
देश | खेळाडू |
अफगाणिस्तान | २९ |
ऑस्ट्रेलिया | ७६ |
बांगलादेश | १३ |
कॅनडा | ४ |
इंग्लंड | ५२ |
आयर्लंड | ९ |
इटली | १ |
नेदरलँड्स | १२ |
न्यूझीलंड | ३९ |
स्कॉटलंड | २ |
द आफ्रिका | ९१ |
श्रीलंका | २९ |
युएई | १ |
युएसए | १० |
वेस्ट इंडिज | ३३ |
झिंबाब्वे | ८ |
हेही पहा –
Join Our WhatsApp Community