- ऋजुता लुकतुके
रविवारी आयपीएलच्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी सगळ्याचं लक्ष होतं ते घणाघाती फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतकडे. सकारात्मक फलंदाजी करणाऱ्या रिषभवर किती बोली लागते आणि तो कोणाकडे जातो याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. शिवाय दिल्ली कॅपिटल्स या त्याच्या आधीच्या संघाकडे राईट-टू-मॅच पर्यायही शिल्लक होता. लखनौ, बंगळुरू, हैद्राबाद आणि खुद्द दिल्लीचा संघ यांच्यात पंतसाठी चढाओढ सुरू होती. २ कोटींच्या आधारभूत किमतीवर बोली सुरू झाली आणि ती चढत गेली. (IPL Mega Auction)
दिल्ली कॅपिटल्सचा संघही यात सहभागी झाल्यामुळे त्यांनाही तो हवा होता हे स्पष्ट होतं आणि त्यांच्याकडे राईट-टू-मॅचचा पर्यायही होता. पण, तरीही दिल्ली संघाला रिषभला विकत घेता आलं नाही. नेमकं का ते समजून घेऊया. आधी रिषभ पंतवर बोली लागली आणि ती वाढत गेली तो क्षण पाहूया, (IPL Mega Auction)
(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मुंबईत १८ माजी नगरसेवकांनी आजमावले आमदारकीसाठी नशीब, फक्त तिघांनाच मिळाले यश)
𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱-𝗯𝗿𝗲𝗮𝗸𝗶𝗻𝗴 𝗥𝗶𝘀𝗵𝗮𝗯𝗵 🔝
Snippets of how that Historic bidding process panned out for Rishabh Pant 🎥 🔽 #TATAIPLAuction | #TATAIPL | @RishabhPant17 | @LucknowIPL | #LSG pic.twitter.com/grfmkuCWLD
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
राईट-टू-मॅच हा पर्याय खेळाडूच्या आधीच्या संघ मालकांकडे उपलब्ध असतो. त्यांनी एखाद्या खेळाडूला मुक्त केलेलं असेल आणि लिलावात त्यांना तो पुन्हा हवा असेल तर त्या खेळाडूवर जी सर्वोच्च बोली लागते तेवढे पैसे द्यायची तयारी असेल तर तुम्हाला त्या सर्वोच्च बोलीवर खेळाडू तुमच्याकडे ठेवून घेता येतो. अर्थात, खेळाडू सगळ्यात शेवटी तुमच्या फ्रँचाईजीकडे खेळलेला असला पाहिजे. दोन किंवा त्यापेक्षा जुन्या हंगामात खेळलेल्या खेळाडूसाठी हे कार्ड वापरता येत नाही. शिवाय आयपीएलच्या नियमाप्रमाणे असं एकच कार्ड वापरता येतं. (IPL Mega Auction)
रिषभ पंतच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्सचं तेच झालं. लखनौ आणि दिल्ली असे दोन संघ रिषभ पंतसाठी शेवटपर्यंत बोली लावत होते. लखनौची बोली २०.७५ कोटी रुपयांपर्यंत गेली असतानाच दिल्ली ने राईट-टू-मॅच कार्ड वापरण्याचं ठरवलं. आणि तसं सांगितलंही. पण, लखनौ संघ ऐकायला तयार नव्हता. त्यांनी बोली २७ कोटींपर्यंत वाढवली. बोली इतकी वाढल्यावर दिल्लीने माघार घेणंच पसंत केलं. आणि इच्छा असूनही त्यांना पंतला कायम ठेवता आलं नाही. (IPL Mega Auction)
२०१६ हे रिषभ पंतचं पहिलं आयपीएल वर्षं होतं. पण, दिल्लीकडे २०२२ मध्ये पंत आला तेव्हा त्याची किंमत १६ कोटी रुपयांवर गेली होती. तीच आता २७ कोटींवर गेली आहे. यष्टीरक्षण, नेतृत्व आणि सलामी पासून कुठल्याही क्रमांकवर खेळण्याची तयारी यामुळे टी-२० प्रकारात रिषभ पंत उपयोगी खेळाडू मानला जातो. (IPL Mega Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community