IPL Mega Auction : २०२४ च्या मेगा लिलावात संघ मालकांनी केली विक्रमी खरेदी

IPL Mega Auction : १० फ्रँचाईजींनी मिळून या लिलावात ६३९ कोटी रुपये खर्च केले. 

41
IPL Mega Auction : डेव्हिड वॉर्नर ते पृथ्वी शॉ, लिलावात बोली न लागलेले खेळाडू पाहूया
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या २०२५ सालच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच सौदी अरेबियात जेद्दाह इथं पार पडला आहे. १० फ्रँचाईजी मालकांनी मिळून १८२ खेळाडूंसाठी ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. २०२२ च्या लिलावातील ५५१.७ कोटी रुपयांचा उच्चांक या लिलावाने मोडला. तर रिषभ पंतनेही सगळ्यात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम केला. लखनौ सुपरजायंट्स संघाने त्याच्यासाठी २७ कोटी रुपये मोजले. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी ०२ ते १२ डिसेंबर कालावधीत परीक्षा)

श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनी यंदा मुक्त केलं होतं आणि अलीकडे सय्यद मुश्ताक अली करंडकात सलग दोन शतकं करून श्रेयसने आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. त्यामुळे श्रेयसलाही लिलावात चांगली किंमत मिळाली. आणि पंजाब किंग्जने त्याला २६.७५ कोटी रुपये देत खरेदी केलं. पंत आणि श्रेयस हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे लखनौ आणि पंजाब या त्यांच्या संघाचं नेतृत्व करण्याचीही शक्यता आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविताना BJP ला करावी लागते आहे तारेवरची कसरत)

याआधी आयपीएलचा मेगा लिलाव २०२२ मध्ये बंगळुरू इथं झाला होता आणि त्या लिलावात २०४ खेळाडूंसाठी संघ मालकांनी ५५१.७ कोटी रुपये खर्च केले होते. पण, हा उच्चांकही या लिलावात मागे पडला आहे. २०२२ मध्ये इशान किशनवर मुंबई इंडियन्सनी सर्वाधिक १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्या खालोखाल दीपक चहरला १४ तर श्रेयस अय्यरला १२ कोटी रुपये मिळाले होते. आवेश खानसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाने १० कोटी रुपये मोजले होते. अननुभवी खेळाडूसाठी तोपर्यंत मोजलेली ही सर्वाधिक रक्कम होती. लिअम लिव्हिंगस्टोन आणि वानिंदू हसरंगा या परदेशी खेळाडूंवरही कोट्यवधीची बोली लागली होती. यंदा आशिया बाहेरच्या खेळांडूंचा भाव मात्र लिलावात कमी झालेला दिसला. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.