मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का

263

दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनच्या जागी मुंबई इंडियन्सने राइली मेरेडिथची बदली खेळाडू म्हणून घोषणा केली. मुंबईने राइली मेरेडिथला १.५ करोड रूपयाला विकत घेतलेले. राइली मेरेडिथ आयपीएलमध्ये पंजाब किंग्‍स आणि मुंबई इंडियंनचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. नुकतच मुंबईने जसप्रीत बुमराह च्या जागी संदीप वॉरियरला आपल्या संघात घेतले.

झाय रिचर्डसनला हैमस्ट्रिंगमध्ये दुखापत झालेली. त्याचबरोबर त्याची सर्जरीही झालेली. मुंबईने पञक जारी करून ही माहिती दिली. हैमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या १६ व्या हंगामाला मुकावे लागल. झायला 1.5 करोड रुपयात मुंबई इंडियंसने विकत घेतलेले. याच किमतीत मेरेडिथला विकत घेतले. मागील वर्षी मुंबई इंडियंसच प्रतिनिधित्‍व करताना ८ मैच मध्ये ८ विकेट घेतलेले.

(हेही वाचा नेताजींच्या नातूच्या डोक्यात केमिकल लोच्या! मुघल-नाझींबद्दल प्रेमाचा उमाळा, वीर स्वातंत्र्यवीर आणि राजपूतांचा द्वेष)

राइली मेरेडिथ चेन्‍नई सुपरकिंग्‍स बरोबर होणाऱ्या मॅच अगोदर मुंबई संघात दाखल होणार आहे. २६ वर्षीय मेरेडिथने  ऑस्‍ट्रेलियासाठी एक वनडे आणि पाच टी20 इंटरनॅशनल मॅच खेळला आहे. टी20 इंटरनॅशनल करीअरमध्ये त्याने ८ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये एकूण १२ मॅच खेळून १२ विकेट घेतले आहेत. मुंबईचा पुढचा सामना चेन्‍नई बरोबर आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून हे संघ ओखले जातात. मुंबईने आतापर्यंत एक सामना खेळला असून त्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर चेन्‍नईने दोन सामने खेळून एक जिंकला तर एक गमवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.