IPL Owner’s Meeting : खेळाडूंविषयीच्या अनेक नियमांवर आयपीएल फ्रँचाईजी मालकांमध्ये खडाजंगी?

IPL Owner’s Meeting : पुढील वर्षी मोठा लिलाव होणार की नाही यावर मतभेद दिसून आले 

108
IPL Owner’s Meeting : खेळाडूंविषयीच्या अनेक नियमांवर आयपीएल फ्रँचाईजी मालकांमध्ये खडाजंगी?
IPL Owner’s Meeting : खेळाडूंविषयीच्या अनेक नियमांवर आयपीएल फ्रँचाईजी मालकांमध्ये खडाजंगी?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमधील १० फ्रँचाईजी मालकांची बीसीसीआयने आयोजित केलेली बैठक ही अपेक्षेप्रमाणेच वादळी ठरली. काही फ्रँचाईजींना पुढील वर्षी मोठा लिलावच नको होता. इतरांना मोठा लिलाव नसेल तर मग आतापेक्षा जास्त खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा हवी होती. इम्पॅक्ट खेळाडू, मॅच कार्ड असे आणखी कितीतरी मुद्दे वादाचे ठरले. (IPL Owner’s Meeting)

ही बैठक संपल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एक छोटीसी प्रेसनोट काढली आहे. यात, ‘फ्रँचाईजी मालकांबरोबर आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा करत आहोत. एका आठवड्यात सहमती होईल,’ असं म्हटलं आहे. पण, प्रत्यक्षात ही चर्चा बरीच वादळी आणि आग्रही मतांची ठरली, असं समोर येत आहे. (IPL Owner’s Meeting)

(हेही वाचा- Anshuman Gaikwad No More : कर्करोगाशी झुंजत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन )

काही फ्रँचाईजी मालकांनी याविषयी उघडपणे मतं व्यक्त केली. त्यावरून मतभेदाचे मुख्य मुद्दे हे खेळाडूंना कायम राखण्याचा नियम, इम्पॅक्ट खेळाडूचा नियम, मोठा लिलाव हे होते. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे पार्थ जिंदाल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘कितीतरी मुद्यांवर आमचे बीसीसीआयशी मतभेद आहेत. आता बीसीसीआयच सगळ्याचा साकल्याने विचार करून निर्णय घेईल. खेळाडूंचा मोठा लिलाव घेऊच नये असं काहीचं म्हणणं पडलं. मला याचं आश्चर्य वाटलं. मोठा लिलाव न घेता, छोटे-छोटे लिलाव झाले तर त्याने काय फरक पडणार आहे?’ असा सवालही पार्थ यांनी केला. (IPL Owner’s Meeting)

किती खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा मिळावी, यावरही फ्रँचाईजी मालकांमध्ये मतभेद आहेत. काहींना ७-८ खेळाडू कायम ठेवण्याची मुभा हवी आहे. तर काहींना ही संख्या ४-५ असावी असं वाटतं. (IPL Owner’s Meeting)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : बॅडमिंटनच्या पहिल्या बाद फेरीत अखेर लक्ष्य सेन वि. एच एस प्रणॉय)

बैठकीत संघ मालकांची मतं विचारात घेतल्यानंतर आता बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएल गव्हर्निंग परिषदेची मतं विचारात घेतली जातील. आणि या सगळ्यांचा विचार घेऊन २०२५ च्या हंगामासाठी आयपीएलची नवीन नियमावली तयार करण्यात येईल. यात इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमातही बदल होऊ शकतो. (IPL Owner’s Meeting)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.